मनमानी कारभारामुळे ठेकेदाराचा सातारा पालिकेला रामराम!

Satara
SataraTendernama
Published on

सातारा (Satara) : सोनगाव कचरा डेपो आणि त्‍याठिकाणी सुरू कामे आणि त्‍यातील प्रशासकीय अनागोंदीबाबत पालिकेच्‍या सभागृहात नेहमीच चर्चा होत असे. त्याकडे दुर्लक्ष करत कचरा डेपोतील मनमानी कारभारामुळे पालिकेचा आरोग्‍य विभागातील फायद्याची कार्यक्षमता नेहमी चर्चेत असायची. या चर्चेला आणि तांत्रिक-अतांत्रिक बाबींना कंटाळत कचऱ्यापासून खतनिर्मितीसह इतर कामांचा करण्‍याचा ठेका घेतलेल्‍या इंदोर येथील कंपनीने पालिकेचे काम थांबवले आहे.

Satara
धारावी पुर्नविकासात 'डीएलएफ' दावेदार? 'अदानी', 'नमन'चेही टेंडर

शहर आणि परिसरातील कचरा घंटागाडीच्‍या मदतीने संकलित केला जातो. त्‍यावर सोनगाव येथील कचरा डेपोत प्रक्रिया करण्‍यात येते. संकलित कचऱ्याचे वजन करणे, त्‍याचे वर्गीकरण - विलगीकरण करणे, ओल्‍या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यासह इतर कामांचा ठेका पालिकेने विविध ठेकेदारांना दिला आहे. याठिकाणी करण्‍यात येणाऱ्या विविध कामांपैकी खतनिर्मितीसह विलगीकरणाचे काम इंदोर येथील एका ठेकेदाराने घेतले होते. पालिकेची यंत्रणा आणि खासगी मनुष्‍यबळाचा ताळमेळ घालत इंदोर येथील तो ठेकेदार याठिकाणी खतनिर्मितीसह इतर कामे करत होता. कचरा डेपो, त्‍याठिकाणची कामे, त्‍यातील अर्थकारण, छुप्‍या राजकीय हितसंबंधांबाबत पालिकेच्‍या सभागृहात नेहमी नगरविकास आघाडीच्‍या सदस्‍यांनी प्रश्‍‍न उपस्‍थित केले होते. नविआच्‍या सदस्‍यांनी उपस्‍थित केलेल्‍या प्रश्‍‍नांना बगल देत, पालिका प्रशासन राजकीय पाठबळावर नेहमीच त्‍या कामांची पाठराखण करत असे. प्रशासनाची पाठराखण, मिळणारे अभय आणि टक्केवारीसह त्‍या कामातील राजकीय हस्‍तक्षेपामुळे याठिकाणच्‍या कामावर मर्यादा येऊ लागल्‍या. सततच्‍या दबावामुळे नंतर या कामादरम्‍यान प्रशासकीय आणि राजकीय संघर्ष उभा राहिल्‍याचे चित्र निर्माण झाले.

Satara
शिंदे-फडणवीसांमुळे मोदींची बुलेट ट्रेन सुसाट; 135 किमीसाठी टेंडर

राजकीय-प्रशासकीय संघर्ष...

ठेकेदारीच्‍या कामादरम्‍यान राजकीय आणि प्रशासकीय संघर्ष उभा राहिल्‍याचा परिणाम ठेकेदाराच्‍या अर्थकारणावर झाला. अर्थकारण खंडित झाल्‍याने तसेच विविध कारणास्‍तव पालिका प्रशासनाकडून आर्थिक कोंडी निर्माण झाल्‍याने इंदोर येथील त्‍या ठेकेदाराने त्‍या कामावरील लक्ष कमी केले. त्‍याचा परिणाम कचरा डेपोतील इतर कामांचा खोळंबा होऊन सार्वजनिक आरोग्‍य धोक्‍यात आले. यामुळे मध्‍यंतरीच्‍या काळात सोनगाव ग्रामस्‍थांनी पालिकेस निवेदन दिले होते. यानुसार कार्यवाही पालिका प्रशासनाकडून सुरू असतानाच इंदोर येथील त्‍या ठेकेदाराने आर्थिक कोंडीच्‍या कारणास्‍तव काम बंद केले. ठेकेदाराने हे काम बंद करण्‍यामागे पालिकेचा मनमानी कारभार कारणीभूत असल्‍याची चर्चा पालिकेत सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com