'म्हैसाळ'साठी 2000 कोटींचे टेंडर; मुख्यमंत्र्यांची तत्वत: मान्यता

Eknath Shinde
Eknath ShindeTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : सांगली (Sangli) जिल्ह्यातील जत (Jat) तालुक्यातील म्हैसाळ पाणी योजनेच्या विस्तारित प्रकल्पाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वत: मान्यता दिली आहे. येत्या जानेवारीपासून या २ हजार कोटीच्या टेंडर प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. या प्रकल्पामुळे जत तालुक्यातील ४८ गावे ओलिताखाली येणार आहेत.

Eknath Shinde
सरकारच्या धोरणालाच हरताळ; 'मलई'च्या पोस्टिंगचे फुटले टेंडर

सध्याच्या महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमा भागातील गावांच्या प्रश्नावर लक्ष घातले आहे. विशेषत: जत तालुक्याचा उल्लेख कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर वादळ उठले होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांकडून तिथल्या प्रश्नांची माहिती घेतली. माहितीनुसार म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेचा समावेश कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पात करण्यात आला. त्यासाठी सुमारे दोन हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्याबाबत त्वरित पुढील कार्यवाही करावी आणि १ जानेवारीपासून या कामाची टेंडर प्रक्रिया काढून काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

Eknath Shinde
जानेवारीमध्ये 'मनोरा' पुर्नविकासाला प्रारंभ; टेंडर अंतिम टप्प्यात

महाराष्ट्र सरकारने २०१६-१७ मध्ये या योजनेतील सुमारे ६ टीएमसी पाणी कर्नाटकला दिले होते. त्या बदल्यात तुबची बबलेश्वर योजनेतील पाणी जतच्या वंचित भागाला देण्याबाबत पत्रव्यवहारही झाला होता. परंतु कर्नाटक सरकारने त्यास प्रतिसाद दिला नाही. जतमधील सुमारे ४८ गावांमधील ३० हजार हेक्टर जमीन ओलिताविना राहिली. त्याचेच पडसाद नव्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर उमटले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नव्या निर्णयामुळे जतमधील पाण्याच्या प्रश्नाची तीव्रता कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com