बेळगाव (Belagavi) : रोजगार हमी योजनेचे ओंबुड्समन (Ombudsman) यांना वाहन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी बेळगाव जिल्हा पंचायतीकडून टेंडर (Tender) मागविण्यात आले आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी एक वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर ही सेवा असणार आहे.
सप्टेंबर २०२१ मध्ये ग्रामीण विकास आयुक्तालयाने ओंबुड्समन यांना जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून वाहन सेवा उपलब्ध करून दिली जावी, अशी सूचना केली आहे. त्यानुसार जिल्हा पंचायतीकडून मासिक भाडे आधारावर वाहन घेतले जाणार आहे. पर्यटन खाते, प्रवासी संस्था किंवा खाजगी वाहन मालक टेंडर प्रक्रियेत भाग घेऊ शकतात. वाहनाला येलो बोर्ड असणे आवश्यक आहे. जिल्हा पंचायतीकडून टेंडर अर्ज घेऊन भरावा. भरलेला अर्ज ८ एप्रिल पूर्वी जिल्हा पंचायतीच्या योजना संचालकांच्या शाखेमध्ये असलेल्या टेंडर पेटीत घालावी.
टेंडरची रक्कम ३ लाख ६० हजार रुपये असून, ९ हजार रुपये इएमडी शुल्क भरावे लागणार आहे. ८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पर्यंत टेंडर अर्ज भरला जाऊ शकतो. तर ११ एप्रिल रोजी टेंडरची तांत्रिक आणि आर्थिक बीड खुले केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा पंचायतीच्या डीआरडीए शाखेशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.