Baramati : बारामतीतील सीसीटीव्ही प्रकल्पाला मुहूर्त लागेना; काय आहे कारण?

CCTV
CCTVTendernama
Published on

बारामती (Baramati) : बारामती शहरावर तिसऱ्या डोळ्याच्या माध्यमातून नजर ठेवणारा सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरा प्रकल्प अजूनही कार्यान्वित झालेला नाही. त्यामुळे या प्रकल्पाला मुहूर्तच मिळेना, अशी स्थिती बनली आहे. बारामतीच्या सीसीटीव्ही प्रकल्पास उच्चाधिकार समितीची (हाय पॉवर कमिटी) मंजुरी मिळाली नसल्याने हा प्रकल्प अजूनही कार्यान्वित होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

CCTV
शाब्बाश रे पठ्ठ्या! ठाण्यातील बिल्डरचा महाप्रताप; म्हाडाच्या जमिनीवर काढले 200 कोटींचे कर्ज

शहरातील कायदा व सुव्यवस्थेला मदत व्हावी, गुन्ह्यांवर वचक राहावा, शहरातील प्रमुख ठिकाणी घडणाऱ्या घडामोडींचे चित्रीकरण व्हावे, व त्याच्या मदतीने गुन्हेगारांपर्यंत पोहोचता यावे, असा यामागचा उद्देश होता. शहरातील चोऱ्या रोखण्यासह वाहतूक नियंत्रणासाठीही या सीसीटीव्ही कॅमेरा प्रकल्पाची मदत पोलिसांना होणार आहे.

CCTV
Pune : मिळकत कर भरण्यास टाळाटाळ करणे भोवले

हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री हे प्रयत्नशील आहेत. मात्र, किचकट शासकीय प्रक्रियेतून हा प्रकल्प अद्यापही मार्गी लागत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अनेकांनी या प्रकल्पात अनेक त्रुटी काढल्याने व ठराविक वेळेत याबाबतचे काम पूर्ण न झाल्याने दोन वर्षांहून अधिक काळ हा प्रकल्प केवळ कागदावरच राहिलेला आहे.

सरकारीस्तरावर या प्रकल्पाला खोडा घालण्याचेच काम सातत्याने झाले. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पाबाबत फक्त बैठका आणि बैठकाच झाल्या. मात्र, अजूनही या प्रकल्पाचे कागदी घोडेच नाचविले जात असल्याचे चित्र आहे.

CCTV
Tender Scam : 'महाज्योती'च्या 'त्या' टेंडरमधील गैरव्यवहाराची चौकशी करा

असा आहे प्रकल्प

नवीन प्रस्तावात ३२० अत्याधुनिक कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरावर नजर ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामध्ये एकाच नियंत्रण कक्षात बसून प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाणार आहे. यामध्ये २०० कॅमेरे हे कायमस्वरूपी लावले जाणार असून उर्वरित १२० कॅमेरे हे फेस रेकनेसेशन प्रणालीचे असतील.

याशिवाय या प्रकल्पात पँरारोमिक, पीटीझेड तसेच एएनपीआर व ड्रोन कॅमेरेही लावण्याचे नियोजन केले आहे. एखाद्या व्यक्तीचा स्पष्ट चेहरा दिसावा, नंबरप्लेट दिसून यावी, असा प्रयत्न यात होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com