Nagar : ‘एएमटी’ची चाके रूतली!; ठेकेदाराकडून फक्त आठ-दहाच बस सुरू

Ahmednagar
AhmednagarTendernama
Published on

अहमदनगर (Ahmednagar) : महापालिकेने सुरू केलेली शहर बससेवा (एएमटी) सध्या शेवटच्या घटका मोजत आहे. जेमतेम आठ-दहाच बस सुरू आहेत, त्या देखील ठराविकच रूटवरच धावतात. त्यामुळे ‘असून अडचण नसून खोळंबा,’ अशी अवस्था शहर बससेवेची झाली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

Ahmednagar
CIDCO Lottery: दसऱ्याच्या मुहूर्तावर सिडकोची मेगा सोडत; मोक्याच्या ठिकाणी तब्बल 40 हजार घरे

महापालिकेने नगरकरांच्या सोयीसाठी शहर बससेवा सुरू केली. दीपाली ट्रान्स्पोर्ट या स्थानिक ठेकेदार संस्थेला हे काम देण्यात आले. महापालिकेने केलेल्या करारनाम्यानुसार ठेकेदार संस्थेने ३० बस सुरू करणे अपेक्षित होते. परंतु, ठेकेदार संस्थेने वेगवेगळी कारणे पुढे करून केवळ १५ बस सुरू केल्या आहेत. त्यातही काही बस बंद आहेत. त्यामुळे शहरात सध्या केवळ आठ-दहाच बस धावत आहेत. परंतु, शहरातील विद्यार्थी आणि प्रवाशांच्या तुलनेत या बसची संख्या तोकडी आहे. शहरात १९२ शाळांसह मोठी महाविद्यालये आहेत. त्यात हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात, त्याचबरोबर नोकरदार आणि कामगारांची संख्या देखील मोठी आहे. या सर्वांसाठी शहर बससेवा महत्त्वाची आहे. मात्र, पुरेशा बस नसल्याने प्रवाशांना नाईलाजास्तव रिक्षाने प्रवास करावा लागतो. रिक्षाचालकही प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने भाडे वसूल करत आहेत. रात्रीच्या वेळी प्रवाशांची अडवणूक देखील होत आहे. त्यासाठी पुरेशा बस सुरू करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.

Ahmednagar
Mumbai : 1 किमी रस्त्याचा खर्च 19.50 कोटी; मुंबईत दोन टप्प्यात 135 किमी सीसी रस्त्यांची कामे

एएमटीची गरज - ३०

एएमटी सुरू - १०

अंदाजे प्रवासी - १७०००

प्रस्तावित ई-बस - ४०

एएमटीच्या फेऱ्या - १०५

ई-बस सुरू होणार

ठेकेदार संस्थेने ३० बस सुरू करणे अपेक्षित आहे. सध्या शहरात १५ बस सुरू आहेत. शहरात लवकरच ई-बससेवा सुरू करण्यात येणार आहे. शासनाकडे ४० ई-बसचा प्रस्ताव पाठवलेला आहे. लवकरच ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

बस फेऱ्या वाढविण्याची गरज

शहरात १९२ शाळांसह सात मोठी महाविद्यालये आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना शहर बससेवेची आवश्यकता आहे. सध्या सुरू असलेल्या आठ-दहा बस शहराच्या ठरावीक भागातच फेऱ्या करतात. नागापूर, एमआयडीसी, निर्मलनगर, भिंगार, केडगाव या उपनगरांमध्ये बसच्या फेऱ्या वाढविण्याची आवश्यकता आहे.

Ahmednagar
Pune : मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पाचा मार्ग मोकळा; राष्ट्रीय हरित लवादाने...

दरमहा ५ लाख देण्याचा ठराव

महापालिकेने नगरकरांसाठी शहर बससेवा सुरू केली. सुरुवातीला ‘प्रसन्ना’ या कंपनीकडे हा ठेका होता. त्यानंतर स्थानिक ठेकेदार संस्था दीपाली ट्रान्स्पोर्टला हा ठेका देण्यात आला. परंतु, या संस्थेने टेंडरमधील अटी-शर्तीप्रमाणे बसची संख्या वाढविली नाही. उलट नुकसान भरपाईपोटी दरमहा पाच लाख रुपयांची मागणी महापालिकेकडे करण्यात आली. महापालिकेने देखील तसा ठराव मंजूर केला आहे.

ई-बससाठी प्रतीक्षा

केंद्र सरकारच्या माध्यमातून शहरात ई-बस सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव महापालिकेने केंद्राकडे पाठविला असून, त्याला मंजुरी देखील मिळाली आहे. परंतु, दीड वर्ष उलटले, तरी ई-बस सुरू झालेल्या नाहीत. केडगाव उपनगरात ई-बसच्या डेपो व चार्जिंग स्टेशनची जागा देखील निश्‍चित करण्यात आलेली आहे. चार्जिंग स्टेशनसाठी टेंडर प्रक्रिया सुरू आहे. असे असले तरी नगरकरांना ई-बससाठी आणखी काही दिवस प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

बस थांब्याची दुरवस्था

महापालिकेने शहरात ठरावीक ठिकाणी एएमटीसाठी बसथांबे केले आहेत. मात्र, या बसस्थानकांची मोठी दुरवस्था झाली आहे. बाक मोडले आहेत, बसथांब्यांच्या छताला गळती लागली आहे. मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचाच वावर या बसथांब्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे. बस आणि बसथांब्यांची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com