गुड न्यूज: कोल्हापूर एअरपोर्टसाठी ५२ कोटी; या सोईसुविधा...

Kolhapur Airport
Kolhapur AirportTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी राज्य सरकारने नुकताच 52 कोटी 72 लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. या निधीमुळे कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंग तसेच इतर सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे कोल्हापूर परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी 'उडाण' योजना आखली आहे. सिंधुदुर्गातील चिपी, नांदेड, गोंदिया, नाशिक तसेच कोल्हापूर विमानतळावरुन विमानसेवा सुरु झाली आहे.

Kolhapur Airport
गुंठेवारी कायदा- घरे नियमित करण्याची संधी; 31 ऑगस्टपर्यंत करा अर्ज

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरचे विमानतळ अतिशय मोक्याचे आहे. हे विमानतळ सुरु झाले आहे. तिरुपती दर्शन करून कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला येणार्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यासाठी विशेष ट्रेनही आहे. तिरुपती-कोल्हापूर विमानसेवाही आहे. पण या विमातनळावर नाइट लँडिंगची सुविधा नाही. त्यामुळे धावपट्टी वाढवण्यासाठी भूसंपादनाची गरज भासणार आहे. या भूसंपादनासाठी राज्य सरकारने 52 कोटी 72 लाख 57 हजार 500 रुपयांचा निधी वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

Kolhapur Airport
अबब! शिवाजी पार्कात फक्त पाणी मारण्यासाठी BMCचे 1 कोटीचे टेंडर...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी, नांदेड, गोंदिया व नाशिकमधून विमानसेवा सुरु झाली आहे. शिर्डी विमानतळावरुन आतापर्यंत 11 लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. आतापर्यंत शिर्डी विमानतळावरुन मालवाहू विमानाने 1 लाख 70 हजार किलो शेतमाल देशाच्या इतर भागात वाहून नेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य विमानतळ कंपनीकडून सोलापूर, अमरावती, कराड, धुळे व चंद्रपूरमध्ये विमानसेवा सुरु करण्याची योजना आहे. सोलापूर, अमरावती, कराड व चंद्रपूरमध्ये जागा उपलब्ध आहे. या प्रकल्पासाठी सध्या केंद्र सरकारच्या परवानग्या, पर्यावरण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र यासह इतर आवश्यक परवानग्या घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Kolhapur Airport
मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरातील 'या' कामांसाठी १८५ कोटींचे टेंडर

महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाकडून राज्यातील विमानतळांसाठी पाठपुरावा सुरु आहे. 'उडाण' योजनेअंतर्गत नऊ विमानतळांपैकी सहा विमानतळांवरुन विमानसेवा सुरु झाली आहे. जमिनी संपादित केलेल्या ठिकाणी नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यात येत आहे. त्यासाठी विमानतळ प्राधिकरणासह विविध केंद्रीय विभागांच्या परवानग्या मिळवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. पालघरमध्ये विमानतळ उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारने आखली आहे. मुंबई विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी पालघरमध्ये विमानतळ उभारण्यासाठी हालचाल सुरु झाली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com