'कास'च्या १०२ कोटींच्या 'अतिरिक्त पाइपलाइन'ला मंजुरी; लवकरच टेंडर

Udayanraje Bhosale
Udayanraje BhosaleTendernama
Published on

सातारा (Satara) : केंद्राच्या अमृत २.० योजनेतून तांत्रिक मान्यता घेऊन कास धरण (Kaas Dam) ते पॉवरहाउस पर्यंतच्या अतिरिक्त पाइपलाइनसाठी १०२ कोटी ५६ लाखांच्या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. आता टेंडर (Tender) प्रक्रिया राबवून या कामाची सुरवात करण्यात येईल, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी दिली.

Udayanraje Bhosale
पुणे: कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटण्याच्यादृष्टीने मोठे पाऊल

सातारा पालिकेच्या मालकीच्या कास धरणाची नुकतीच उंची वाढवण्यात आली आहे. यामुळे पूर्वीच्या क्षमतेपेक्षा पाच पटीने वाढ होऊन ५०२ दशलक्ष घनफूट इतकी झाली आहे. सातारकडे येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा दाब वाढला आहे. म्हणूनच पालिकेने तातडीने सध्याच्या पाइपलाइन व्यतिरिक्त आणखी एक पाइपलाइन टाकण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मंजुरी दिली. याकामी मध्यंतरी केंद्रीय गृहनिर्माण व नागरी विकास मंत्रालयाचे मंत्री हरदीपसिंह पुरी यांची समक्ष भेट घेऊन योजनेला मान्यता देण्याची मागणी केली होती. मंत्री पुरी यांनी त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देवून अमृत २.० मधून मान्यता देत असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार केंद्र शासनाच्या शिखर समितीने या योजनेस मान्यता दिली.

Udayanraje Bhosale
नितीन गडकरींच्या १९०० कोटींच्या नागनदी प्रकल्पाला 'ग्रीन सिग्नल'

त्यानुसार कास धरण ते पॉवरहाउस अशी सुमारे २७ किलोमीटरची नवीन अतिरिक्त पाइपलाइन टाकण्यासह, १६ एमएलडी क्षमतेचा फिल्टरेशन प्लॅन्ट तसेच १० लाख लिटर्स क्षमतेची पॉवरहाउस येथे नवीन पाण्याची टाकी उभारणे आणि एक मेगावॉट क्षमतेचा जलविद्युत निर्मितीचा प्रकल्प या महत्त्‍वाच्या आणि सातारकरांना चिरकाल लाभ देणाऱ्या कामांचा समावेश आहे. सुमारे २७ किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनकरिता डीआय आणि एमएस पाइपलाइन वापरण्यात येणार आहे. आज धरणातून अस्तित्वातील पाइपलाइनमधून दररोज कोणताही खर्च न येता सुमारे ९ एमएलडी शुध्द-स्वच्छ पाणी सातारकरांना उपलब्ध होत आहे. नवीन पाइपलाइन पूर्ण झाल्यावर एकूण ४४ एमएलडी शुध्द-स्वच्छ पाणी उपलब्ध होईल. केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० या योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या नवीन अतिरिक्त पाइपलाइनच्या १०२ कोटी ५६ लाख खर्चापैकी सुमारे ३४ कोटी रुपये केंद्र शासन देणार आहे, तर राज्य शासन ५३ कोटी देणार आहे. पालिकेचे सुमारे १५ कोटींच्या लोकवर्गणीतून सहभाग असणार आहे.

Udayanraje Bhosale
अखेर राज्यात गुंतवणूक आली! 'या' कंपनीची महाराष्ट्राला पसंती

आता तातडीने टेंडर प्रक्रिया राबविली जावून त्यानंतर पाइपलाइन टाकण्याच्या कामाला सुरुवात होईलच. या कामी केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सहकार्य लाभल्याचे खासदार उदयनराजेंनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com