भूखंडाचे श्रीखंड!; आशीष शेलार यांच्या निकटवर्तीयांना एक हजार कोटींचा भूखंड; युवक काँग्रेसचा आरोप

वांद्रे येथील एक हजार कोटी किंमतीचा आठ एकर भूखंड केवळ दहा लाखात
Ashish Shelar
Ashish ShelarTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : महायुती सरकारचा आणखी एक भूखंड घोटाळा उजेडात आला आहे. वांद्रे येथील तब्बल एक हजार कोटी रुपये किंमतीचा आठ एकरचा भूखंड केवळ दहा लाख रुपयांच्या अनामत रकमेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संस्थेच्या घशात घालण्यात आला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड. आशीष शेलार यांच्या वरदहस्ताने हा प्रताप झाल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस अक्षय जैन यांनी केला आहे.

Ashish Shelar
Mumbai Pune Expressway : नियम मोडणाऱ्यांना आता दणका! संपूर्ण 94 किलोमीटरवर...

संबंधित संस्थेला हा भूखंड तब्बल तीस वर्षांसाठी देण्यात आला आहे. राज्यात पुन्हा महायुती सरकार येण्याची शाश्वती नसल्यामुळे दीर्घ लीज करार करण्यात आला आहे. शेलार यांच्या निकटच्या व्यक्तीचा याच्याशी संबंध असल्याचेही जैन यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. वांद्रे पश्चिम हा मुंबईतील अत्यंत महागडा परिसर आहे. मात्र हा भूखंड सरकारच्या आशीर्वादाने काही खास लोकांना सौंदर्यीकरण आणि मेंटेनन्सच्या नावाखाली अक्षरशः फुकट देण्यात आला आहे. त्यामुळे जनतेच्या हक्काचा हा भूखंड राजकीय वरदहस्त असलेल्या लोकांच्या हातात गेल्याने सर्वसामान्यांचे नुकसान झाल्याचा आरोपही अक्षय जैन यांनी केला आहे.

Ashish Shelar
Mumbai : महायुती सरकारच्या बिल्डर धार्जिण्या धोरणाला झटका; काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित फाऊंडेशनला नाममात्र दरात 30 वर्षांसाठी भलामोठा भूखंड दिला असताना शासन निर्णयानुसार मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याला प्रशिक्षण कामासाठी 2 हजार स्क्वेअर मीटर म्हणजेच वरील संस्थेला दिलेल्या जागेच्या तुलनेत फक्त 5 टक्के जागा त्याच भूखंडात तब्बल चार कोटींपेक्षा जास्त वार्षिक दर लावून दिल्याचा आरोपही जैन यांनी केला. संबंधित फाऊंडेशनकडून विविध संस्थांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सुविधांमध्येही लूट सुरू असल्याचे जैन यांनी म्हटले आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com