'या' वादग्रस्त कंपनीवर शिंदे-फडणवीस मेहरबान का? २० कोटींच्या...

Shinde Fadnavis
Shinde FadnavisTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांच्या जीवनावर आधारित चित्रपट (Movie) निर्मिती करणाऱ्या एलोक्यन्स मीडिया प्रा. लिमिटेड कंपनीने चित्रपट तयार करण्यास दिरंगाई करूनही शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde - Fadnavis Govt.) पुन्हा एकदा याच कंपनीला टेंडर (Tender) दिले आहे. महाविकास आघाडी सरकारने (MVA) या कंपनीला ब्लॅकलिस्ट (Blacklist) केले होते. टेंडरमधील अटी शर्थी न पाळल्याने एलोक्यन्स कंपनीला सरकारने दणका देत मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थगित केला होता. महाविकास आघाडीने ब्लॅकलिस्ट करूनही शिंदे - फडणवीस सरकारने संबंधित कंपनीवर विशेष मेहेरनजर केली आहे.

Shinde Fadnavis
शिंदे-फडणवीसांना गुजरातने चुना लावला; 'हा' मोठा प्रकल्पही पळवला

महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मिती करण्यासाठी एलोक्यन्स मीडिया प्रा. लिमिटेड कंपनीला राज्य सरकारने २० कोटींचे टेंडर दिले होते. राज्य सरकार पैसे देणार असले तरी चित्रपटाचे सर्व अधिकार हे खासगी कंपनीकडे असणार आहेत. टेंडर दिल्यानंतर संबंधित कंपनीबाबत अनेक नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. टेंडर दिले परंतु कंपनीची निवड होणत्या निकषांआधारित केली, याचा कोणताही आधार समोर येऊ शकलेला नाही. कंपनीच्या निर्मितीत अनियमितता आणि भ्रष्टाचार झाला असल्याचाही आरोप आहे. या कंपनीशी करार केलेली फाईल गहाळ कशी झाली याबाबतही संभ्रम आहे.

Shinde Fadnavis
तुकडेबंदीचा निर्णय शिंदे सरकार उठविणार? खंडपीठाच्या निर्णयाने...

करार झाल्यानंतर एका वर्षात चित्रपट पूर्ण झाला नाही तर कंपनीला रोज एक लाख रुपये दंड आकारला जाणार होता. चार वर्षानंतरही चित्रपट निर्मितीला सुरुवात झालेली नाही, तरी सुद्धा राज्य सरकारने कंपनीला दंड का केला नाही असाही सवाल उपस्थित होत आहे.
या चित्रपटाची निर्मिती करतान अनेकदा नियमांचे उल्लंघन केल्याने कंपनी वादात सापडली होती. त्यामुळे ठाकरे सरकारने या कंपनीला मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थगित केला होता, मात्र सत्तांतर होताच शिंदे - फडणवीस सरकारने या कंपनीला मुदतवाढ दिली आहे. एलोक्यन्स मीडिया प्रा. लिमिटेड कंपनीवर शिंदे फडणवीस सरकारने विशेष मेहेरनजर केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com