६,६७२ कोटींचे बजेट असलेल्या 'या' मेट्रोचे ५८ टक्के काम पूर्ण

Mumbai Metro
Mumbai MetroTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी-कांजूरमार्ग या १४.४७ किमीच्या मेट्रो ६ मार्गिकेचे काम सध्या वेगात सुरु असून आतापर्यंत ५८ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दिली आहे. या प्रकल्पासाठी ६,६७२ कोटी खर्च प्रस्तावित आहे.

Mumbai Metro
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; पोलिस भरतीसाठी आता आधी...

पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरांमधील अंतर कमी करून येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएने मेट्रो ६ प्रकल्प हाती घेतला आहे. १३ मेट्रो स्थानकांचा समावेश असलेल्या या मेट्रो मार्गिकेच्या कामाला २०१८ मध्ये सुरुवात झाली. या मार्गिकेचे कारशेड कांजूरमार्ग येथे प्रस्तावित करण्यात आले. या जागेला तत्कालीन सरकारने मंजुरी दिली. मात्र, कांजूरमधील कारशेडमध्ये काम सुरु करण्याआधीच ही जागा वादात अडकली.

Mumbai Metro
पुणे-मुंबई प्रवास आता होणार अधिक आरामदायक! एसटीचा मोठा निर्णय...

मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सिप्झ) चे कारशेड आरेतून कांजूरला मेट्रो ६ च्या प्रस्तावित कारशेडच्या जागेवर हलविले. मात्र त्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात मालकी हक्कावरून वाद सुरु झाला. त्याचा फटका मेट्रो ६ लाही बसला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून मेट्रो ३ आणि मेट्रो ६ च्या कारशेडचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. असे असले तरी एमएमआरडीएकडून मेट्रो ६ चे काम मात्र वेगात सुरु आहे. त्यानुसार आतापर्यंत ५८ टक्के बांधकाम पूर्ण झाल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com