Pune: पुणे जिल्ह्यातील अपूर्ण कामे कॉंक्रिटीकरणाद्वारे पूर्ण करणार

Ravindra Chavan.
Ravindra Chavan.Tendernama
Published on

मुंबई (Mumbai) : पुणे जिल्ह्यातील (Pune District) हवेली व वेल्हे तालुक्यातील पुणे-खडकवासला, डोणजे - रोजणे रस्ता आणि डोणजे - कोंढणपूर खेड शिवापूर रस्त्यांची अपूर्ण कामे कॉंक्रिटीकरण करून लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

Ravindra Chavan.
ZP: बांधकामचे 12 स्थापत्य सहायक पाणीपुरवठाचे कनिष्ठ अभियंता कसे?

पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्ला आणि पानशेतकडे जाणाऱ्या रस्त्याच्या निकृष्ट दर्जांच्या कामाबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानसभा सदस्य भीमराव तापकीर, प्रकाश अबिटकर, योगेश सागर, सुभाष धोटे, हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत मांडला होता.

Ravindra Chavan.
Nagpur : 'मेयो'तील औषधांच्या काळ्याबाजाराची 3 महिन्यांत चौकशी

चव्हाण म्हणाले, पुण्यातील रस्त्याचे काम अधिक दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. रस्त्याचे काम सुरू असताना वेळोवेळी ऑडिट सुद्धा करण्यात येईल. या कामाला अधिक गती देण्यासाठी आणि अडचणी समजून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची लवकरच एकत्र बैठक घेऊन आवश्यक त्या सुधारणा करून कालमर्यादित काम पूर्ण करण्यात येईल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com