मुंबई (Mumbai) : वर्सोवा-विरार सीलिंकचा विस्तार पुढे पालघरपर्यंत करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वरळी ते वांद्रे, वांद्रे ते वर्सोवा आणि वर्सोवा ते विरार हा सीलिंक प्रकल्प हाती घेतला आहे. याच मार्गाचा पुढे पालघरपर्यंत विस्तार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे.
'एमएमआरडीए'ने नुकतेच हे टेंडर प्रसिद्ध केले आहे. प्रकल्पाचा खर्च मात्र तब्बल ३० हजार कोटींनी वाढला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील प्रकल्प प्रामुख्याने 'एमएमआरडीए' राबवते. त्यामुळे सिलिंकची जबाबदारी 'एमएमआरडीए'कडे सोपवण्यात आली आहे
कोस्टल रोड, वांद्रे-वरळी सी लिंक, वांद्रे-वर्सोवा सी लिंक आणि वर्सोवा-विरार विस्तारामुळे नरिमन पॉइंट ते विरार दरम्यानचा प्रवासाचा वेळ तीन तासांवरुन एका तासापर्यंत घटणार आहे. सध्या वांद्रे ते वर्सोवापर्यंतच्या १७ किमीच्या सी-लिंकचे काम प्रगतिपथावर आहे; तसेच वर्सोवा ते विरार मार्गासाठी थेट जपानच्या जायका संस्थेने कर्ज देण्यास मान्यता दिली आहे. ही मार्गिका एकूण ४३ किमी आहे. तिचा खर्च ३१,४२६ कोटींवरून थेट ६३,४२४ कोटींवर गेला आहे.