सफाई कामगारांच्या ८० कोटींवर 'या' कंत्राटदाराचा डल्ला

BMC
BMCTendernama
Published on


मुंबई (Mumbai) : मुंबई महानगर पालिकेतील (Mumbai Municipal Corporation) सहा हजार ५०० कंत्राटी सफाई कामगारांची भविष्य निर्वाह निधीची (PF) जवळपास ८० कोटीची रक्कम कंत्राटदाराने (Contractor) भरलेलीच नसल्याचे उघडकीस आले आहे. इतकेच नव्हे तर ‘पीएफ’च्या नावाखाली दोन्ही बाजूंनी कंत्राटदार पैसे काढत असून, या कामगारांची खातीच उघडलेली नसल्याची बाब समोर आली आहे.

BMC
सुरत-चेन्नई ग्रीन कॉरिडॉरने राज्यातील 'या' जिल्ह्यांचा चेहराच...

कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या ‘पीएफ’साठी महापालिका त्यांचा हिस्सा कंत्राटदाराकडे देते आणि कंत्राटदार कामगारांचा हिस्सा त्यांच्या वेतनातून वळते करतो. मात्र प्रत्यक्षात कंत्राटदार ‘पीएफ’मध्ये पैसे जमाच करत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच हा गैरव्यवहार घडला असल्याचा आरोप कचरा वाहतूक श्रमिक संघाचे सरचिटणीस मिलिंद रानडे यांनी केला.

BMC
कागल ते सातारा महामार्गाच्या सहापदरीकरणाचे ४४७९ कोटींचे टेंडर

रानडे म्हणाले, की कामगारांचे ‘पीएफ’चे पैसे दिल्याची खात्री केल्यानंतरच कंत्राटदाराचे शुल्क द्यायचे हा नियम आहे. महापालिकेच्या कामगारांनी याबाबत कधीच खात्री केली नसल्याने हा गैरव्यवहार घडल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

BMC
७४१ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण अखेर पूर्ण; खर्च...

सफाई कामगाराच्या भविष्य निर्वाह निधीच्या कोणत्या खात्यात किती रक्कम जमा आहे, याची माहिती तीन दिवसांत उपलब्ध करून देण्याचा आदेश कामगार विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव यांनी २०१८ मध्ये दिला होते. तेव्हापासून आम्ही याचा पाठपुरावा करीत आहोत. मात्र मुंबई महापालिका आणि कंत्राटदार कोणीही ही माहिती देवू शकले नाही, असे रानडे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com