डबल डेकर ई-बसमधून करा जीवाची मुंबई; 'या' कंपनीला 200 गाड्यांचे...

Double Decker E-Bus
Double Decker E-BusTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबईकरांच्या सेवेत स्विच मोबिलिटी लिमिटेडची (Switch Mobility Ltd.) डबल डेकर इलेक्ट्रिक बस आज लॉंच झाली. बेस्टने (BEST) डिसेंबरपासून २०० इलेक्ट्रिक बसेस पुरवठा करण्यासाठीचा करार कंपनीसोबत केला आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे डबल डेकर इलेक्ट्रिक बसच्या मॉडेलचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) उपस्थितीत अनावरण करण्यात आले. (India’s first Electric Double Decker Air Conditioned Bus Launched In Mumbai By Nitin Gadkari)

Double Decker E-Bus
चौपदरीकरणानंतरही पुणे-नाशिक प्रवासाला का लागताहेत ६ तास?

सुरवातीच्या टप्प्यात कुलाबा आणि कुर्ला या दोन मार्गांवर ही बससेवा मुंबईकरांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबईत सध्याच्या डबल डेकरच्या मार्गावर बेस्टच्या इलेक्ट्रीक बसेस धावणार आहेत. देखभाल दुरुस्तीसाठी, तसेच चार्जिंगच्या सुविधेसाठी बेस्टने दोन डेपोची जागा स्विच मोबिलिटीला उपलब्ध करून दिली आहे. स्विच मोबिलिटीकडून भाडे तत्वावर या बसेस बेस्ट उपक्रमाला देण्यात येणार आहेत. या बसेसची देखभाल, तसेच वाहकही स्विच मोबिलीटीचा असेल. तर तिकिटांसाठीचे काम हे बेस्ट उपक्रमाकडून करण्यात येईल. बेस्टला सुरुवातीच्या टप्प्यात २०० इलेक्ट्रिक बसेस पुरवठा करण्यासाठीचा करार करण्यात आला आहे.

Double Decker E-Bus
सारोळा घाट रस्त्याला वन विभागाची आडकाठी; पर्यटकांचा मार्ग धोकादायक

मुंबईसारख्या शहराच्या गरजा ओळखूनच भारतीय बनावटीची अशी बस मुंबईकरांच्या प्रवासासाठी उपलब्ध करून देत असल्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली. मुंबईतल्या वाहतूक कोंडीचा विचारसुद्धा या इलेक्ट्रिक बसेस डिझाईन करताना केला आहे. या बसेसमध्ये दोन दरवाजांसह एमर्जन्सी एक्झिटचाही समावेश आहे. तसेच मुंबईतील पाणी भरण्याची समस्या पाहता या बसेसमध्ये प्रवेशासाठीची उंची सध्याच्या बसेससारखीच ठेवण्यात आली आहे. मुंबईतील खड्ड्यांचा विचार करूनच उत्तम दर्जाची अशी सस्पेन्शन सिस्टिम बसेससाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Double Decker E-Bus
तगादा : न्हावाशेवा कंटेनर टर्मिनलच्या 'त्या' निर्णयामुळे नाराजी

या इलेक्ट्रिक बससाठी चेसी, स्टेअरिंग, मोटर कंट्रोल यासारख्या भागांचा समावेश हा भारतीय बनावटीच्या कंपन्यांकडूनच करण्यात आला आहे. तसेच बसमध्ये अग्निशमन यंत्रणाही सज्ज आहे. बससाठी डबल चार्जिंगची सुविधा असून, अवघ्या ४० मिनिटांमध्ये बस १८० किमी प्रवासासाठी चार्ज होण्याची क्षमता चार्जिंगच्या यंत्रणेची आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com