मुंबई मेट्रोची ही 5 स्थानके मिळवून देणार जगातील सर्वाधिक उत्पन्न

Mumbai Metro 3
Mumbai Metro 3Tendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे (Mumbai Metro Rail Corporation) मेट्रो - ३ मार्गिकेवरील (Metro-3) पाच स्थानकांच्या नावांचे अधिकार विविध नामांकित कंपन्यांना देण्यात आले असून, त्याद्वारे कॉर्पोरेशनला वार्षिक ४० कोटी रुपयांचा महसूल नॉन-फेअर बॉक्स महसूल (Non-Fare Box Revenue) मार्फत प्राप्त होणार आहे. मेट्रो-३ कार्यान्वित झाल्यानंतर पुढील ५ वर्षांमध्ये ५ टक्के वाढीसह याद्वारे एकत्रितपणे २१६ कोटींचे उत्पन्न कॉर्पोरेशनला मिळणार आहे. मेट्रो-३ स्थानकांद्वारे दरवर्षी प्रति स्थानक सरासरी ८ कोटी (१.१ मिलियन डॉलर) महसूल प्राप्त होणार असून, ही किंमत आजपर्यंत भारतातील व जगातील सर्वाधिक आहे, अशी माहिती एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिली.

Mumbai Metro 3
EXCLUSIVE : फडणवीसांच्या खात्यात भ्रष्टाचाराचे टोक;टक्केवारीसाठी..

या अंतर्गत कोटक महिंद्रा बँकेकडे वांद्रे कुर्ला संकुल (BKC) स्थानक व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाचे अधिकार, तर आयसीआयसीआय लोम्बार्डकडे सिद्धिविनायक मेट्रो स्थानकाचे अधिकार देण्यात आले. तसेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनकडे (LIC) चर्चगेट आणि हुतात्मा चौक मेट्रो स्थानकांचे नाम अधिकार देण्यात आले आहेत. या अंतर्गत या कंपन्यांना ब्रँडिंगसाठी जागा मिळेल, तसेच ट्रेनच्या घोषणांमध्ये आणि स्थानकांच्या नकाशांमध्ये या कंपन्यांच्या नावाचा उल्लेख केला जाईल. सोबतच त्या कंपन्यांचे नाव संबंधित स्थानकाच्या नावा आधी जोडले जाणार आहे.

Mumbai Metro 3
अबब! नाशिकमध्ये होणार 42 मजली मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब

या अनुषंगाने कोटक महिंद्रा बँक, एलआयसी आणि आयसीआयसीसारख्या नामांकित कंपन्यांशी जोडले जाणे ही आनंदाची बाब आहे. एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे याबाबत म्हणाल्या की, नॉन-फेअर बॉक्स महसूल निर्माण करण्याच्या दिशेने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, ज्यामुळे निधी सुलभ होईल आणि तिकीटाचे शुल्क वाजवी ठेवणे शक्य होईल.

मेट्रो-३ स्थानकांद्वारे दरवर्षी प्रति स्थानक सरासरी ८ कोटी (१.१ मिलियन डॉलर) महसूल प्राप्त होणार असून ही किंमत आजपर्यंत भारतील सर्वाधिक व जगातील सर्वाधिक उत्पन्न प्राप्त करणाऱ्या मेट्रो स्थानकांपैकी एक आहे. दुबई, माद्रिद, जकार्ता, क्वालालंपूर या मेट्रोंचे प्रति स्थानक वार्षिक सरासरी उत्पन्न १ मिलियन डॉलर पर्यंत आहे, असेही भिडे यांनी सांगितले.

Mumbai Metro 3
टोल भरून करा 'या' मृत्यूच्या महामार्गावरून प्रवास; ब्लॅकस्पॉटमुळे

ऑक्टस अॅडव्हायझर्स- स्टुडिओ POD कन्सोर्टियम हे या प्रक्रियेसाठी सल्लागार म्हणून काम बघत होते. उर्वरित स्थानकांच्या नावांचे अधिकार टेंडर मेट्रो-३ कार्यान्वित होण्याआधी (ROD) आमंत्रित करण्याचे नियोजित आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com