Thane : ठाण्यातील 'त्या' पोलिस वसाहतीचा पुनर्विकास मार्गी; म्हाडा 'असे' उभे करणार 450 कोटी

MHADA
MHADATendernama
Published on

मुंबई (Mumbai) : ठाण्यातील (Thane) माजिवडे येथील वर्तकनगर पोलिस वसाहतीचा पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी 'म्हाडा'ने (MHADA) आपल्या हिश्शातील भूखंडाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोकण मंडळाने दोन भूखंडांच्या ई लिलावासाठी टेंडर (Tender) मागविले आहे. या पुनर्विकासासाठी ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, भूखंडाच्या विक्रीसाठी ४५० कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे.

MHADA
BMC : पाण्याला वाट करून देण्यासाठी लागणार 209 कोटींची 'वाट'

वर्तकनगर येथील म्हाडा अभिन्यासात कोकण मंडळाने १९७३ मध्ये पोलिस वसाहत बांधली. या वसाहतीमधील घरे पोलिसांना निवासस्थान म्हणून देण्यात आली होती. आता या वसाहतीतील इमारती जर्जर झाल्या असून, पुनर्विकासाची मागणी झाल्यानंतर इमारती रिकाम्या करून त्या पाडण्यात आल्या.

दरम्यान, प्रकल्प व्यवहार्य ठरवा यासाठी कोकण मंडळाला उपलब्ध होणाऱ्या हिश्शातील भूखंडावर घरे बांधण्याऐवजी भूखंडाचा ई लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

MHADA
Nashik : नाशिक जिल्ह्यातील 191 पाझर तलाव होणार गाळमुक्त! तब्बल साडेतीन कोटींचा...

कोकण मंडळाकडून मार्चमध्येच पुनर्विकासासाठी बांधकामाचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या प्रकल्पात पोलिसांसाठी ५३८ चौरस फुटांची ३८० घरे बांधण्यात येणार आहेत. चार दुकाने आणि येथील २०० झोपड्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. तसेच एक पोलिस ठाणेही बांधून देण्यात येणार आहे.

जूनमध्ये टेंडर अंतिम करून जुलै-ऑगस्टमध्ये पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्याचे कोकण मंडळाचे नियोजन आहे. त्यामुळे माजिवडे येथील वर्तकनगर पोलिस वसाहतीचा रखडलेला पुनर्विकास लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com