ठाण्याच्या गावदेवी मैदानातील भूमिगत वाहनतळाचे टेंडर

Thane
ThaneTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : ठाणे (Thane) रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी गावदेवी मैदानात उभारण्यात आलेल्या भूमिगत वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या वाहनतळाचे येत्या १ मे रोजी लोकार्पण करण्यासाठी ठाणे महापालिकेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ठाणे महापालिकेने या वाहनतळाचा ठेका देण्यासाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे.

Thane
जेएनपीटीला गोवा व पुण्याशी जोडण्यासाठी मोठी घोषणा, १७०० कोटी खर्च

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पुरेशा वाहनतळाची सुविधा उपलब्ध नव्हती. यामुळे नागरिक रस्त्याकडेला वाहने उभी करतात. या वाहनांचा वाहतुकीस अडथळा होऊन कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या भागातील रस्ते वाहतुकीसाठी मोकळे राहावेत आणि नागरिकांना वाहनतळाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्यातूनच महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेतंर्गत गावदेवी मैदानात भूमिगत वाहनतळाची उभारणी केली आहे. हे वाहनतळ ४,३३० चौरस मीटरचे असून त्यामध्ये १३० चारचाकी वाहने तर १२० दुचाकी वाहने उभी करण्याची सुविधा निर्माण होणार आहे. हे काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचा महापालिकेचा मानस होता. परंतु कोरोना काळात प्रकल्पाच्या कामाचा वेग मंदावल्यामुळे डिसेंबर महिन्यात काम पूर्ण होऊ शकले नाही. गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेने या कामाचा वेग वाढविला असून हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

Thane
ठाणे मनपाचे 'ते' टेंडर फिक्स; राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आरोप

सद्य:स्थितीत वाहनतळाच्या छताचछताच्या वाटरप्रूफिंगचे काम सुरू असून हे काम जवळपास ७५ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम झाल्यानंतर वाहनतळावरील मैदान पूर्ववत करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. येत्या काही दिवसांत ही कामे पूर्ण करून येत्या १ मे रोजी या वाहनतळाचे लोकार्पण करण्यासाठी महापालिकेच्या प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. लोकार्पण झाल्यानंतर वाहनतळ सुरू करण्यास उशीर होऊ नये म्हणून महापालिकेने वाहनतळाचा ठेका देण्यासाठी टेंडर काढले आहे.

Thane
ठाणे-कळवा; नव्या खाडी पूल बांधकामाला तारीख पे तारीख...

वाहनतळातील विद्युत देयके, देखभाल व दुरुस्ती अशी कामे ठेकेदाराला करावी लागणार आहेत. वाहनांकडून किती पैसे आकारायचे याचे दर महापालिका निश्चित करणार आहे. यापूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने पार्किंगचे दर निश्चित केले असून त्याप्रमाणे पार्किंगचे दर आकारले जाणार आहेत. तसेच जो ठेकेदार उत्पन्नातील जास्त वाटा महापालिकेला देईल, त्याला कामाचा ठेका दिला जाणार आहे. यामुळे महापालिकेला उत्पन्न मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com