मुंबईत ग्रीन एनर्जीला ग्राहकांची पसंती; तब्बल 'इतक्या' हजार...

ENergy
ENergyTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई उपनरातील टाटा पॉवरच्या तब्बल 17 हजार घरगुती वीज ग्राहकांनी पर्यावरण संवर्धनासाठी ग्रीन एनर्जीला (सौर अथवा पवन ऊर्जा) पसंती दिली आहे. ते सर्वसामान्य विजेच्या तुलनेत प्रतियुनिटमागे 66 पैसे जादा मोजून सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पात तयार झालेली वीज वापरत आहेत. त्यामुळे वर्षाला सुमारे 126 किलो टन कार्बनचे उत्सर्जन कमी झाले आहे.

ENergy
गुंठेवारीबाबत मोठा निर्णय! 10 गुंठे जमीन खरेदी-विक्री होणार शक्य?

मुंबई शहर आणि उपनगरात सुमारे 45 लाख वीज ग्राहक असून त्यांची विजेची कमाल दैनंदिन मागणी साडेतीन हजार मेगावॅट एवढी आहे. त्यामध्ये टाटा पॉवरचे सुमारे सात ते आठ लाख वीज ग्राहक असून त्यांचा दररोज सुमारे 800 मेगावॅट एवढा वीज वापर आहे. एकूण वीज वापराच्या सुमारे 70 ते 80 टक्के वीज कोळशावरील औष्णिक वीज प्रकल्पातून घेतली जात असल्याने वीजनिर्मिती करताना मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हे प्रदूषण टाळण्याबरोबरच एखाद्या वीज ग्राहकाला जर ग्रीन एनर्जी म्हणजे सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पात तयार झालेली वीज वापरायची असेल तर महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने ग्रीन एनर्जीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी सर्वसाधारण वीज दराच्या तुलनेत प्रतियुनिटसाठी 66 पैसे जादा मोजावे लागतील असे स्पष्ट केले होते. त्यानुसार उपनगरातील टाटा पॉवरच्या 17 हजार ग्राहकांनी ग्रीन एनर्जीला पसंती दिली असल्याचे टाटा पॉवरने स्पष्ट केले. तसेच ग्रीन एनर्जीला पसंती देणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

ENergy
अबब! शिवाजी पार्कात फक्त पाणी मारण्यासाठी BMCचे 1 कोटीचे टेंडर...

टाटा पॉवरने ग्रीन एनर्जीअंतर्गत उपनगरातील 395 ग्राहकांच्या छतावर रुफ टॉप सोलर प्रकल्पांची उभारणी करून दिली आहे. त्यानुसार येथे तयार होणारी वीज संबंधित वीज ग्राहक वापरत असून अतिरिक्त ठरणारी वीज नेट मीटरिंगच्या माध्यमातून वीज कंपनीला पुरवली जात असून त्याचे पैसे संबंधित ग्राहकाला मिळतात.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com