Coastal Road : दुसऱ्या टनेलचे काम महिन्यात पूर्ण होणार

Mumbai Coastal Road
Mumbai Coastal RoadTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : कोस्टल रोडच्या कामाअंतर्गत सध्या दुसऱ्या टप्प्यातील टनेलिंगचे काम सुरू आहे. तर एकूण प्रकल्पाचे काम ७० टक्के इतके पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर २०२३ पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे उद्धिष्ट मुंबई महापालिकेने ठेवले आहे. दुसऱ्या टप्प्यातील टनेलिंगच्या कामाअंतर्गत १८० मीटरच्या बोगद्याचे काम अद्यापही शिल्लक आहे. फेब्रुवारी अखेरीस या प्रकल्पातील टनेलिंगचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

Mumbai Coastal Road
Big News: जलयुक्त शिवार योजनेची ACB चौकशी गुंडाळली? कारण...

कोस्टल रोडच्या प्रकल्पाअंतर्गत प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सी लिंक या प्रकल्पाअंतर्गत काम सध्या दक्षिण ते उत्तर अशा पद्धतीने टनेलिंगचे काम सुरू आहे. या टनेलची एकूण लांबी २०७२ मीटर इतकी आहे. त्यापैकी १८० मीटरचे काम शिल्लक असल्याची माहिती देण्यात आली. सध्या या प्रकल्पाअंतर्गत ७० टक्के काम झाले आहे. या प्रकल्पाला २०१८ मध्ये सुरूवात झाली होती.

Mumbai Coastal Road
BAMU : ॲथेलेटीक सिंथेटिक ट्रॅक प्रकरणी टेंडर विभागाची मेहरबानी

या प्रकल्पामध्ये वरळी येथील समुद्रातील दोन पीलरच्या मधील १२० मीटरच्या भागाला सपोर्ट देण्याचे अतिरिक्त काम वाढले आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम आणखी चार ते पाच महिने पुढे जाण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाअंतर्गत एकूण १११ हेक्टरचे ९७ टक्के इतके रिक्लेमेशन पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाअंतर्गत ७६ टक्के समुद्रभिंत तयार करण्यात आली आहे. तर पाईल्सचे काम ९० टक्के झाले आहे. पिलर्सचे काम ४८ टक्के इतके झाले आहे. तर मोनोपाईल्सचे काम ७१ टक्के इतके झाले आहे. उत्तर ते दक्षिण असा २०७२ मीटरचा बोगदा याआधीच पूर्ण झालेला आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com