राज्य सरकारचा 'असा' आहे मास्टर प्लॅन! NDRFच्या 9 तुकड्या तैनात...

State Govt
State GovtTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : पूर आणि भूस्खलनाचा सामना करण्यासाठी दरड कोसळण्याचा धोका असलेल्या गावांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासंबंधीचे धोरण आणले जात असून, दरड कोसळणाऱ्या ६९ गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच, ज्या ठिकाणी वीज पडते अशा ठिकाणी विजेला रोखण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Ajit Pawar Latest News)

State Govt
'या' नव्या नियमांमुळे जून महिन्यात तुमच्या खिशाला लागणार कात्री

सह्याद्री अतिथीगृह येथे मान्सून पूर्वतयारीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी उपस्थित होते.
मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, गेल्या काही वर्षांत राज्याच्या कोणत्या ना कोणत्या भागाला पुराच्या संकटाचा सामना करावा लागला आहे. पूर आणि भूस्खलनाचा सामना करण्यासाठी कायमस्वरूपी दरड कोसळण्याचा धोका असलेल्या गावांच्या पुनर्वसनासंबंधी धोरणही लवकरच मंजूर होणार असून यामुळे दरड कोसळणाऱ्या गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन होईल. राज्यातील १४ जिल्ह्यात सॅटेलाईट फोन, ६९ ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडू शकतात अशा गावांचे कायमस्वरुपी पुनर्वसन, ज्या जिल्ह्यात पूर येतो अशा जिल्ह्यांना ११६ बोटी व १८ मदत व शोध कार्यासाठी अत्याधुनिक वाहने उपलब्ध करून दिली आहेत.

State Govt
'स्मार्ट' ठेकेदारांनो सावधान! रस्त्यांचा दर्जा सांभाळा, अन्यथा...

ज्या ठिकाणी वीज पडते अशा ठिकाणी वीज अटकावासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसविणे. सर्व जिल्ह्यांसाठी स्टेट ऑफ आर्ट उपग्रह संप्रेषण व्यवस्था तसेच जीआयएससक्षम, आर्टिफिशल इंटेलिजन्स आधारीत निर्णयासाठी सहाय्यभूत ठरणारी व्यवस्था निर्णय घेणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल. जीव आणि मालमत्तेचे रक्षण करण्याच्या दृष्टीने प्रभावी प्रतिसाद आणि निर्णय घेणे यामुळे शक्य होईल, असेही मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.

State Govt
खूशखबर! पोलिस दलात तब्बल 15 हजार जागा भरणार; वाचा सविस्तर...

आपत्ती कालावधीत शून्य मृत्यूदर हे शासनाचे ध्येय असून, आपत्ती प्रतिसाद यंत्रणा ही राज्यात लागू करण्यात येत आहे. आपत्तीत प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी सर्व यंत्रणामध्ये योग्य तो समन्वय रहावा यासाठी ही यंत्रणा काम करणार आहे. अचानक येणारे पूर, दरडी कोसळणे आदी आपत्तीला तोंड देण्यासाठी स्थानिक ठिकाणची प्रशासकीय यंत्रणा गतीमान असली पाहिजे यासाठी जिल्ह्यांनी मागणी केलेल्या साहित्याची तसेच निधीची उपलब्धतता करून दिली आहे, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

State Govt
Good News! पुणे महापालिकेत नोकरीची संधी; जाणून घ्या सविस्तर...

गेल्या दोन वर्षांत पावसाची सुरवात ही वादळांनीच झाली आहे. यंदा देखील पाऊस चांगला पडेल असा अंदाज आहे. सर्व यंत्रणांनी आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी पूर्वतयारी केली आहे ही चांगली गोष्ट आहे. पावसाळ्यापूर्वी प्रथमच एनडीआरएफच्या नऊ तुकड्या सात जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. आपत्कालीन कालावधीत शून्य जीवितहानी हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. जलसंपदा विभागाने धरणसाठ्यातील पाणी सोडण्याबाबत योग्य नियोजन करून संबधित अधिकाऱ्यांना मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याबाबत आदेशीत करावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत केल्या आहेत, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

State Govt
तुमची 'लालपरी' कात टाकतेय! नव्याकोऱ्या ३,५०० गाड्यांची 'मेगाभरती'

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पूर कालावधीत धरणातील पाणी साठ्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. स्थानिक यंत्रणांनी कोणत्याही परिस्थितीत मुख्यालय सोडू नये. तसेच आपत्ती कालावधीत संपर्क यंत्रणा प्रभावी असण्यासाठी देखील आपत्ती विभागाने दक्ष रहावे. मुंबईत पाणी साठल्यामुळे मॅन होल वरती जाळी बसवून ज्या ठिकाणी जाळी बसवली आहे त्या ठिकाणी मॅन होल आहे हे समजावे यासाठी मोठी पताका उभारावी जेणेकरून या ठिकाणी लोक जाणार नाहीत.

State Govt
अजित पवारांच्या आक्रमक भूमिकेनंतर ठेकेदारांची संपातून माघार

कोकण तसेच कोल्हापूर, सातारा व सांगली या भागात वाढता पुराचा धोका लक्षात घेता राज्य आपत्ती प्रतिसाद दल व राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची टीम कायमस्वरूपी या भागात राहण्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे, ही चांगली गोष्ट आहे. आपत्ती कालावधीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिल्या.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com