'समृद्धी'च्या नादात कंत्राटदारास सव्वातीनशे कोटींचा दंड

Jalna
JalnaTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई ते नागपूर (Mumbai to Nagpur) समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) कामात सहभागी असलेल्या कंत्राटदारांना (Contractor) दणके देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुरवात केली आहे. सरकारने निर्धारित केलेल्या गौण खनिजापेक्षा अधिकचे उत्खनन करुन स्वतःची समृद्धी करु पाहणाऱ्या कंत्राटदारास जबरी किंमत मोजावी लागली आहे. गौण खनिजाचे अवैध उत्खनन केल्याप्रकरणी महामार्गाचे कंत्राटदार मॉन्टे कार्लो लि. (Monte Carlo Ltd.) या कंपनीला 328 कोटींचा दंड ठोठावण्यात आला असून, त्यांना लगेच तो दंड भरावा लागणार आहे. या दंडाच्या विरोधातील कंपनीने केलेली आव्हान याचिका सर्वाेच्च न्यायालयाने (Supreme Court) नुकतीच फेटाळली आहे. त्यामुळे दंड टाळण्यासाठी वेगवेगळ्या पळवाटा शोधू पाहणाऱ्या या कंपनीला हे प्रकरण चांगलेच महागात पडले आहे.

Jalna
भाग २ : जालनारोड विस्तारीकरणाच्या गडकरींच्या घोषणा गडगडल्या

जालना जिल्ह्यात समृद्धी महामार्गाच्या कामासाठी गौण खनिजाचं अवैध उत्खनन केल्याप्रकरणी प्रशासनाने तीन टप्प्यात 328 कोटींचा दंड ठोठावला होता. समृद्धी महामार्गाचे कंत्राटदार मॉन्टे कार्लो लि. या कंपनीला ठोठावलेल्या 328 कोटी दंडाच्या विरोधातील आव्हान याचिका सर्वाेच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळली आहे. जालना जिल्ह्यातील जालना तालुका आणि बदनापूर तालुक्यात समृद्धी महामार्गाच्या कामासाठी अवैध गौण खनिज उत्खनन केल्याबाबत जालन्याच्या तहसीलदारांनी ठोठावलेल्या 328 कोटी रुपयांच्या दंडाविरुद्ध कंत्राटदार संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या तीन वेगवेगळ्या याचिका यापूर्वीच फेटाळल्या होत्या. दरम्यान सर्वाेच्च न्यायालयाने कंपनी विरोधातील याचिका फेटाळल्याने कंपनीला 328 कोटी रुपये दंड आता भरावाच लागणार आहे.

Jalna
कर्जाच्या चक्रात फसलेल्या एसटी महामंडळाची अशीही फसवाफसवी

जालना जिल्ह्यात परवानगीच्या मर्यादेपेक्षा कंपनीने जास्त गौण खनिजाचे उत्खनन केल्याच्या समितीच्या अहवालावरुन तहसीलदारांनी मॉन्टे कार्लो कंपनीला 165 कोटी, 87 कोटी व 77 कोटी अशा तीन टप्प्यांत एकूण 328 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. तहसीलदारांनी ठोठावलेल्या दंडाविरुद्ध कंपनीने तीन वेगवेगळ्या याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केल्या होत्या. या तिन्ही याचिका औरंगाबाद खंडपीठाने यापूर्वीच फेटाळल्या होत्या.

Jalna
'कोळसा धुवा अन् कोट्यवधी कमवा'; १२०० कोटींच्या टेंडरवर प्रश्न?

मुंबई-नागपूर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे 700 किमी पैकी 500 किमीचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील अधिवेशनात दिली होती. समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, कदाचित मार्च महिन्यापर्यंत समृध्दी महामार्ग काहीअंशी सुरु होण्याची शक्यता आहे. कॉम्प्रेड रिजिड सिमेंट पेव्हर या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा महामार्ग बनविण्यात आला आहे. याशिवाय, नागपूर-मुंबई दरम्यान 701 किमीच्या या मार्गावर कुठेही गतिरोधक नाही. या महामार्गाची वेग मर्यादा तासी 150 किमी जरी असली तरी, या महामार्गाची वेगमर्यादा 180 किमी प्रति तास बनविण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com