Mumbai Metro : मेट्रोच्या मास्टर प्लॅनिंगमागील वाघ!

Mumbai Metro
Mumbai MetroTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने आर. रमणा यांची संचालक (नियोजन आणि रिअल इस्टेट डेव./NFBR) तर राजीव त्यागी यांची संचालक (प्रणाली आणि संचलन व देखभाल) (Operation and Maintenance) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Mumbai Metro
ठाणे क्लस्टरअंतर्गत 'BMC'सह खासगी भूखंडाबाबत शिंदेंची मोठी घोषणा

शहर नियोजन, वाहतूक व परिवहन, वाहतूक आणि प्रादेशिक नियोजन, वित्त, पायाभूत सुविधांची अंमलबजावणी आणि शहरी महामार्ग अशा विविध प्रकल्पांच्या कामाचा श्री. रमणा यांना तीन दशकांहून अधिक काळाचा दांडगा अनुभव आहे. मुंबई मेट्रोमध्ये साधारण ९ वर्ष श्री. रमणा हे कार्यकारी संचालक (नियोजन) पदी कार्यरत होते. या दरम्यान त्यांनी मुंबई मेट्रो-३ मार्गाची अंमलबजावणी, भूसंपादन, पुनर्वसन, पर्यावरण आणि इंटरमॉडल एकत्रीकरण (Intermodal Integration) संबंधित कामे हाताळली. याशिवाय मुंबई मेट्रो मास्टर प्लॅनिंग, डीपीआर आणि मुंबई २ व ३ च्या विशिष्ट मार्गाच्या अंमलबजावणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. तसेच त्यांनी उच्च न्यायालयात समिती सदस्य म्हणूनही जबाबदारी पार पाडली. अनेक सार्वजनिक सल्ला प्रक्रियांमध्ये त्यांनी सहभाग दर्शवला असून आयआयटी बॉम्बे येथे बाह्य परीक्षक म्हणूनदेखील काम पाहिले.

Mumbai Metro
Mumbai: मोरबे धरणावर जलकुंभ आणि शुद्धीकरण प्रकल्प; 70 कोटींचे बजेट

राजीव यांनी १९९५ साली भारतीय रेल्वेमधून आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली. या २० वर्षाच्या कालावधीत त्यांनी महत्वाच्या विविध पदांवर कार्यभार सांभाळला. त्यांना रेल्वे आणि मेट्रो रेल्वे प्रणालीतील रोलिंग स्टॉक, ओव्हरहेड ट्रॅक्शन, वीज पुरवठा तसेच इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल (E & M) संबंधित जवळपास तीन दशकांच्या कामाचा अनुभव आहे. राजीव यांनी त्यांच्या कार्यकाळात मध्य रेल्वेत उपमुख्य दक्षता अधिकारी (विद्युत) पदावर ५ वर्ष कार्यभार सांभाळला. त्यानंतर मार्च २०१६ साली ते मुंबई मेट्रोमध्ये महाव्यवस्थापक (रोलिंग स्टॉक) पदी रुजू झाले. पुढे त्यांनी कार्यकारी संचालक (रोलिंग स्टॉक) म्हणून पदभार स्वीकारला. दरम्यान त्यांनी मुंबई मेट्रोच्या रोलिंग स्टॉक, डेपो प्लांट आणि इक्विपमेंट अँड ऑपरेशन्स (Equipment & Operations) विभागाचे प्रमुख म्हणून कामकाज पाहिले. या अंतर्गत राजीव यांनी संचलन व देखभाल (Operation and Maintenance) संबंधित कामाच्या विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com