Mumbai : कर्नाक पुलावर 550 मेट्रिक टन वजनाच्या गर्डरचे यशस्वी लॉंचिंग

Bridge
BridgeTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळील कर्नाक पुलाचा गर्डर 70 मीटर रेल्वे मार्गावर बसवण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. सुमारे 70 मीटर लांब आणि 9.50 मीटर रुंद आकाराच्या या तुळईचे वजन सुमारे 550 मेट्रिक टन आहे. तर दुसरा गर्डर येत्या आठवड्यात बसवण्यात येणार असून हे काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे मुंबई महापालिकेचे नियोजन आहे.

Bridge
Mumbai : शिंदे सरकारचा मोठा निर्णय! मुंबईकरांना काय दिली गुड न्यूज?

मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी.डी'मेलो मार्गाला जोडणाऱ्या 154 कर्षे जुन्या कर्नाक पुलाची महानगरपालिकेकडून पुनर्बांधणी सुरू आहे. या प्रकल्पाअंतर्गत 550 मेट्रिक टन वजनाचा दक्षिण बाजूचा लोखंडी गर्डर रेल्वे भागावर 70 मीटरपर्यंत सरकविण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या ब्लॉकनुसार 13 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 12.25 ते पहाटे 5.45 या दरम्यान आणि काल मध्यरात्री 12.30 ते 3.30 या कालावधीत लोखंडी गर्डर यशस्वीपणे सरकविण्यात आला. हा महाकाय गर्डर दक्षिण बाजूस सरकविण्याचे काम येत्या आठवड्यात पूर्ण होईल. तसेच, समांतरपणे पुलाच्या पश्चिमेकडील पोहोच मार्गाचे बांधकाम येत्या आठवड्यातच सुरू करण्यात येईल

Bridge
Mumbai : ठाणे-बोरीवली सुसाट! महायुती सरकारचा जाता जाता मोठा निर्णय

गर्डर सरकविण्याची कार्यवाही तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक होती. त्यासाठी विशेष तज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या परवानगीनंतर व पुढील रेल्वे ब्लॉक मिळाल्यानंतर गर्डर (तुळई) स्थापित करण्याची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. महापालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या पूल विभागाने मध्य रेल्वे प्रशासनासोबत समन्वय साधून काम पूर्ण केले. पुलाच्या बांधकामासाठी गर्डरचे सुटे भाग मुंबईत आल्यावर जोडकाम करून पुलाची एक तुळई बांधणी पूर्ण करण्यात आली. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशीद बंदर रेल्वे मार्गाच्या पूर्व दिशेला तुळई बांधणी व पुलाचा पाया उभारण्याचे काम करण्यात आले. सुमारे 70 मीटर लांब आणि 9.50 मीटर रुंद आकाराच्या या तुळईचे वजन सुमारे 550 मेट्रिक टन आहे. तुळई बसवण्यासाठी रेल्वे रुळांलगत तुळई पूर्णतः अधांतरी (कॅण्टीलिवर) होती. त्यानुसार हा गर्डर पूर्केकडून पश्चिमेकडे सरकविण्यात आला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com