मुंबई-पुणे प्रवास वेगवान करण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय; 2 नवे मार्ग

Railway
RailwayTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई ते पुणे रेल्वे प्रवास आणखी वेगवान होण्यासाठी मध्य रेल्वेने नवीन प्रस्ताव हाती घेतला आहे. कर्जत ते तळेगाव (७२ किमी) आणि कर्जत ते कामशेत (६२ किमी) हे दोन नवे रेल्वे मार्ग तयार करण्याचा मध्य रेल्वेचा प्रस्ताव आहे. दोन्ही प्रस्ताव पूर्ण झाले असून यापैकी एक मार्ग मंजूर झाल्यानंतर लगेचच कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.

Railway
मुंबई-गोवा सहाच तासांत!; 'कोकण एक्सप्रेस-वे'साठी पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया सुरु

नव्या मार्गामुळे लोणावळा टाळून रेल्वे प्रवाशांना पुणे गाठता येणार आहे. नव्या मार्गावर मेल-एक्स्प्रेसचा वेग दुप्पट होईल, शिवाय नव्या १० रेल्वेगाड्या चालवण्याचा पर्यायही खुला होणार आहे. मुंबई-पुणेदरम्यान रेल्वे मार्गात लोणावळा-खंडाळा घाट आहे. प्रवासी सुरक्षिततेमुळे घाटात ताशी ६० किमी अशी वेगमर्यादा मेल-एक्स्प्रेसला आहे. नव्या मार्गावर घाट नसल्याने रेल्वेगाड्या ताशी ११० किमी वेगाने धावू शकणार आहेत.

Railway
ठाण्याला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी 'त्या' पर्यायाची चाचपणी; सल्लागारासाठी टेंडर

कर्जत ते तळेगावदरम्यान ७२ किमीच्या नव्या मार्गावर घाटातील ग्रेडियंट (चढ-उताराची तीव्रता) १.१०० होणार आहे. तर लोणावळा घाटात १.३७ ग्रेडिएंट होणार आहे. यामुळे अतिरिक्त इंजिन जोडण्याची गरज भासणार नाही. कर्जत ते तळेगाव अंतर ५७ किमी असून, नव्या मार्गात अंतर ७२ किमीपर्यंत पोहोचेल, कर्जत ते कामशेत दरम्यान सध्या ४४ किमी असून, नव्या मार्गानुसार ६२ किमी असणार आहे. घाटाऐवजी पर्वतरांगांना वळसा घालावा लागणार असल्याने नव्या मार्गात अंतर अधिक आहे. मुंबई-पुणेदरम्यान दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मुंबई-पुणेदरम्यान १९२ किमीचे अंतर असून, या मार्गावर एकूण ४४ रेल्वेगाड्या धावतात. त्यापैकी २३ रेल्वेगाड्या दररोज धावणाऱ्या आहेत.  

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com