आता काश्मीरमध्येही उभारणार महाराष्ट्र सदन; मंत्री रविंद्र चव्हाणांची माहिती

Ravindra Chavan.
Ravindra Chavan.Tendernama
Published on

मुंबई (Mumbai) : राज्य सरकारच्यावतीने काश्मीरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. त्यादृष्टीने काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी विभागाच्यावतीने ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.

Ravindra Chavan.
Mumbai : महापालिकेचा डंका; 100 किलोमीटर जलबोगदे असणारे जगात दुसरे शहर

यासंदर्भात मंत्री चव्हाण यांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मीर सरकारने बडगाम जिल्ह्यातील इच्चगाम तालुक्यातील २.५० एकर जमीन महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी प्रदान केलेली आहे. जमीन खरेदीची प्रक्रिया महाराष्ट्र व जम्मू-काश्मीर सरकार यांच्यावतीने पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र सदन उभारण्याच्यादृष्टीने दोन्ही राज्यात आवश्यक प्रक्रिया करण्याच्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Ravindra Chavan.
Mumbai Nashik Highway News : मुंबई नाशिक सुसाट... पण तूर्तास नाहीच! कारण काय?

आता या भूखंडावर उभे राहणारे महाराष्ट्र सदन कशा स्वरुपाचे असावे व त्यामध्ये कोणत्या सोयी-सुविधा असतील याचे नियोजन व आराखड्याची प्रक्रिया सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष महाराष्ट्र सदन उभारणीच्या कामाला सुरुवात होईल व लवकरच कश्मिरमध्ये महाराष्ट्र सदन उभे राहिल असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला. बडगाम येथे महाराष्ट्र सरकारच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र सदनासाठी आवश्यक असलेल्या २.५० एकर जमिनीसाठी महाराष्ट्र सरकारने ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे, अशी माहिती मंत्री चव्हाण यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com