मुंबई (Mumbai) : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) पुणे शहराभोवती बांधण्यात येणाऱ्या रिंग रोडच्या (Pune Ring Road) सुधारित कामास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
Eknath Shinde बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पुणे रिंग रोडच्या पूर्व भागात ऊर्से ते सोलू ते सोरतापवाडी (पुणे-सोलापूर रस्ता) या रस्त्याच्या १९,९३२ कोटी ९८ लाख रुपये इतक्या किंमतीच्या कामांना, तसेच पुणे रिंग रोड पश्चिम भागात ऊर्से ते वरवे (बु.) सातारा रोडसाठी २२,७७८ कोटी ५ लाख इतक्या किंमतीच्या कामांना सुधारित मान्यता देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे व पिंपरीची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रिंग रोड हा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे. पुणे रिंगरोड हा एमएसआरडीसीद्वारे ४ ते ६ लेन प्रवेश-नियंत्रित महामार्ग म्हणून विकसित केला जाईल. त्याचे बांधकाम खेड, हवेली, पुरंदर, भोर, मुळशी आणि मावळ या तालुक्यांमधून ९ पॅकेजेस अंतर्गत केले जाईल.
कसा असेल रिंगरोड
बोगदे : आठ
छोटे पूल : तीन
मोठे पूल : दोन
एकूण लांबी : १३६ किलोमीटर
एकूण रुंदी :११० मीटर
पूर्व रिंगरोड : ७१.३५ किमी
पश्चिम रिंगरोड : ६५.४५ किमी