विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा प्रीपेड मीटर? 27 हजार कोटींची 'ती' टेंडर कायमच

Smart Prepaid Meter Tender
Smart Prepaid Meter TenderTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा प्रीपेड मीटर (Prepaid Meters) बसवण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार का? अशी शंका सर्वसामान्य नागरिकांमध्ये उपस्थित केली जात आहे. नागरिकांचा मोठा विरोध झाल्याने 'स्मार्ट प्रीपेड मीटर' बसवणार नसल्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपच्या (BJP) कार्यक्रमात बोलतांना 'नागरिकांच्या घरी नाही, तर केवळ सरकारी कार्यालयांमध्ये हे मीटर बसवणार', असे सांगितले. विधीमंडळातही याविषयी त्यांनी घोषणा केली; मात्र अदानींसह ४ कंपन्यांना दिलेल्या २ कोटी २५ लाख मीटरची ६ टेंडर अद्याप रद्द केलेली नाहीत.  

Smart Prepaid Meter Tender
ठेकेदार गायब; पोलिसच उतरले खड्ड्यात! मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पोलिसांच्या हाती कुदळ अन् फावडे

विशेष म्हणजे प्रीपेड मीटरविषयी महावितरणला आतापर्यंत कोणतेही आदेश अधिकृतपणे मिळालेले नाहीत. सद्यस्थितीत प्रीपेड मीटर्स फक्त सबस्टेशन्स, फीडर्स, ट्रान्सफॉर्मर्स आणि सरकारी कार्यालये येथे लावली जातील, असे म्हटलेले आहे.

या सर्व ठिकाणी एकूण जास्तीत जास्त पंधरा लाख मीटर्स लागतील. असे असताना प्रत्यक्षात सव्वा दोन कोटी मीटर्सची ऑर्डर दिली गेली आहे. तब्बल २७ हजार कोटी रुपयांची ही टेंडर आहेत.

Smart Prepaid Meter Tender
MHADA : म्हाडाची मुंबईत 'या' ठिकाणी अडीच हजार घरांची योजना; दीड हजार गृहनिर्मितीसाठी लवकरच Tender

राज्य सरकारने अथवा महावितरण कंपनीने ही टेंडर्स रद्द करण्याचा अधिकृत निर्णय घेतला आहे, अशी कोणतीही अधिकृत माहिती अद्यापपर्यंत राज्य सरकारने अथवा महावितरण कंपनीने जाहीर केलेली नाही.

राज्य शासन अथवा महावितरण कार्यालयातून याबाबत अधिकृतरीत्या कोणीही काहीच सांगत नाही. त्यामुळे केवळ निवडणुका समोर आहेत म्हणून अशी वक्तव्ये होत आहेत की काय असा संभ्रम निर्माण झाला आहे.

राज्यात स्मार्ट मीटर बसवण्यासाठी ६ टेंडर काढण्यात आलेली होती. यातील १ कोटी १६ लाख मीटरचे सर्वांत मोठे टेंडर अदानींना मिळालेले आहे. नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीला (एन्.सी.सी.) ५७ लाख मीटरची २ टेंडर, माँटे कार्लो कंपनीला ३० लाख ३० हजार मीटरचे १ टेंडर आणि जीनस कंपनीला २१ लाख ७६ हजार मीटरचे १ टेंडर अंतिम झालेले आहे.

महावितरणने काढलेल्या टेंडरना ७ ऑगस्ट २०२३ या दिवशीच मान्यता मिळाली असून त्यानुसार संबंधित पुरवठादारांना पुरवठा आदेश देण्यात आले आहेत.

Smart Prepaid Meter Tender
Sambhajinagar : बीड बायपासच्या दुतर्फा सर्व्हिस रस्त्याला 'बायपास' करणार्‍या मनपावर नागरिक का संतापले?

संबंधित टेंडर्स, पुरवठादार, मीटर्स संख्या व खर्च रक्कम हा तपशील खालीलप्रमाणे आहे.

पुरवठादार टेंडर क्रमांक झोन (परिमंडल) मीटर्स संख्या रक्कम (रु. कोटी)

मे. अदानी
MMD/T-NSC-05/0323
भांडुप, कल्याण, कोकण
63,44,066
7,594.45

मे. अदानी
MMD/T-NSC-06/0323
बारामती, पुणे
52,45,917
6,294.28

मे. एनसीसी
MMD/T-NSC-08/0323
नाशिक, जळगांव
28,86,622
3,461.06

मे. एनसीसी
MMD/T-NSC-09/0323
लातूर, नांदेड, औरंगाबाद
27,77,759
3,330.53

मे. मॉंटेकार्लो
MMD/T-NSC-10/0323
चंद्रपूर, गोंदिया, नागपूर
30,30,346
3,635.53

मे. जीनस
MMD/T-NSC-11/0323
अकोला, अमरावती
21,76,636
2,607.61

● एकूण मीटर्स संख्या 2,24,61,346 (दोन कोटी चोवीस लाख एकसष्ठ हजार तीनशे शेहेचाळीस)

● एकूण खर्च रक्कम 26,923.46 कोटी (रुपये सव्वीस हजार नऊशे तेवीस कोटी शेहेचाळीस लाख)

● सरासरी खर्च 11,986.58 प्रति मीटर (रुपये अकरा हजार नऊशे शहाऐंशी पैसे अठ्ठावन प्रति मीटर)

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com