नरेंद्र मोदींच्या हस्ते 12 हजार 645 कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन

PM Narendra Modi
PM Narendra ModiTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आज, 9 ऑक्टोबर रोजी राज्यात 12 हजार 645 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. 

PM Narendra Modi
होऊ दे खर्च!; महायुती सरकारची जाहिरातबाजीवर कोटीच्या कोट्टी उड्डाणे

यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथील विविध कामांचे व शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील नवीन टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन आणि नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे उ‌द्घाटन व भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. केंद्र सरकारने नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली असून या महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागा 900 नी वाढणार आहेत. एकूण 35 महाविद्यालयात प्रतिवर्ष 4850 एमबीबीएस जागा उपलब्ध होणार आहेत. एकाच शैक्षणिक वर्षात मुंबई, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशिम, अमरावती, भंडारा, गडचिरोली आणि अंबरनाथ (ठाणे) अशा 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या मंजुरीच्या ऐतिहासिक निर्णयांमुळे ग्रामीण व दूरस्थ भागात विशेषोपचार आरोग्यसेवेत लक्षणीय सुधारणा होणार आहे.

PM Narendra Modi
Pune : 'निमगाव खंडोबा' परिसरात रोप-वे, पर्यटन सुविधांचा मार्ग मोकळा; 24 एकर जमीन हस्तांतरित

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथील नवीन एकीकृत टर्मिनल इमारतीची अंदाजित किंमत अंदाजे 7000 कोटी रुपये आहे. सर्व आकारांच्या विमानांसाठी योग्य स्वतंत्र संचालनासह दोन समांतर धावपट्टी, विद्यमान धावपट्टीचे विस्तारीकरण आणि नवीन धावपट्टीचे निर्माण, दरवर्षी 14 दशलक्ष प्रवाशांच्या हाताळणीसाठी 3 लाख चौ.मी.च्या नवीन टर्मिनल इमारतीचा विकास, अंदाजे 9 लाख मेट्रिक टन क्षमतेच्या नवीन कार्गो कॉम्प्लेक्सचा विकास करण्यात येणार आहे. एका वेळी सुमारे 100 विमाने सामावून घेण्यासाठी पार्किंग बे करण्यात येणार आहे. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवीन एकीकृत टर्मिनल इमारत, सुमारे 645 कोटी रूपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांमुळे प्रवाशांना सुखद अनुभव मिळणार आहे. प्रवासी वहन क्षमतेमध्ये वाढ आणि धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. विस्तारित टर्मिनल इमारतीमुळे शिर्डीमधील स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com