Panvel : महापालिकेचे विविध विकासकामांना सव्वा चारशे कोटी

Panvel Municipal Corporation
Panvel Municipal CorporationTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : पनवेल महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील शहर आणि उपनगरांमध्ये रस्ते बांधणीसह विविध कामांसाठी ४२१ कोटी रुपयांच्या ठरावांना मंजूरी देण्यात आली आहे. यामधील अनेक विकासकामे सिडको वसाहतींमध्ये होत असून सिडको मंडळाने बांधलेल्या मुख्य रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण महापालिका प्रशासन करणार आहे.

Panvel Municipal Corporation
Nashik : सिंहस्थातील गर्दी व्यवस्थापनासाठी घेणार इंडिया रेझिलियंट संस्थेची मदत

खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खांदेश्वर, तळोजा, नावडे या विविध वसाहतींचे निर्माण सिडको महामंडळाने केले असून यांतील अनेक वसाहतीं ३० वर्षांपूर्वी उभारल्या गेल्या आहेत. सिडको मंडळाने मागील अनेक वर्षे या वसाहतींमध्ये कॉंक्रीटचे रस्ते बांधले नव्हते. महापालिकेने वाढते नागरीकरण, वाहनांचा ताण ध्यानात घेऊन कॉंक्रीटचे रस्ते बांधण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापालिका परिसरातील उपनगरांमध्ये कॉंक्रीट व डांबरी रस्ते बांधण्यासोबत कळंबोली येथील धारण तलावातील गाळ काढून तिथे पंपहाऊस कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वसाधारण सभेतील मंजूरीनंतर टेंडर प्रक्रियेपूर्वी तांत्रिक मंजूरी मिळविण्याची प्रक्रिया पनवेल महापालिकेत सुरु झाली आहे. येत्या दोन आर्थिक वर्षात सिडको वसाहतींचे मुख्य रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण होणार आहे.

Panvel Municipal Corporation
राज्यभरातील पालकमंत्री फेल; जिल्हा वार्षिक योजनेतील केवळ पाच टक्के खर्च

खारघर उपनगरासाठी १०६ कोटी ८२ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. यामध्ये लिटिलवर्ल्ड मॉल ते उत्सव चौक संपूर्ण रस्ता कॉंक्रीटीकरण, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण केले जाईल. पदपथांचे नूतनीकरण, पदपथ व रस्त्यांची दुरुस्ती, बेलपाडा अंडरपास ते नॅशनल फॅशन टेक्नोलॉजी महाविद्यालय पावसाळी गटार, रस्ते बांधणे, प्रस्तावित बेलपाडा मेट्रो स्थानक ते गणेश मंदीर ते उत्सव चौक या रस्त्याचे कॉंक्रीटीकरणसाठी २३ कोटी ३५ लाख रुपये कळंबोली उपनगरामध्ये शीव पनवेल महामार्गावरील सेक्टर १ येथील शिवसेना शाखा ते रोडपाली येथील अविदा हॉटेलपर्यंतचा संपुर्ण रस्ता कॉंक्रीटीकरण, करावली चौक ते अग्निशमन दल इथपर्यंत कॉंक्रीटीकरण, ८० कोटी ८८ लाख रुपये, तसेच केएलई महाविद्यालय (कामोठे बसथांबा) ते रोडपाली तलाव या रस्त्याचे डांबरीकरण १९ कोटी ९६ लाख रुपये. कळंबोली उपनगरातील एलआयजी बैठ्या वसाहतीलगत धारणतलावातील गाळ काढणे, या तलावाजवळ पंपहाऊस उभारुन तो कार्यान्वित करणे यासाठी ११६ कोटी ६० लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यानंतर या तलावाचे सुशोभीकरण करण्याचे काम महापालिका हाती घेणार आहे. तलावाचे काम करणाऱ्या संबंधित एजन्सीने काम करण्याअगोदर पर्यावरण विषयक मान्यता विविध सरकारी कार्यालयातून मिळविणे त्या एजन्सीची जबाबदारी असणार आहे. कांदळवन समिती व इतर पर्यावरण विषयक मान्यता आतापर्यंत सिडको मंडळाला मिळविता न आल्याने हे काम मागील १५ वर्षांपासून रखडले होते.

Panvel Municipal Corporation
Mumbai : प्रकल्प कागदावरच अन् खर्चात मात्र 2 हजार कोटींची वाढ; टेंडरवर प्रश्न

नवीन पनवेल उपनगरांतील एचडीएफसी सर्कल आणि आदई सर्कल या दोन्ही सर्कलचे कॉंक्रीटीकरणासाठी ६ कोटी ५० लाख खर्च होणार आहेत. पनवेल शहरातील महापालिकेचे नवीन स्वराज्य पालिका मुख्यालयासमोरील मार्ग ते जेएनपीटी मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांचे कॉंक्रीटीकरणासाठी ४६ कोटी ४३ लाख रुपये महापालिका खर्च करणार आहे. पनवेल शहरातील स्वामी नारायण मार्ग (न्यायाधीस निवास ठाणा नाका) ते मित्रानंद सोसायटी कॉंक्रीटीकरण करण्यासाठी ९ कोटी ४६ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com