पनवेलमध्ये तब्बल 7 एकरांवर साकारतोय 'हा' आंतरराष्ट्रीय प्रकल्प

पनवेलमध्ये तब्बल 7 एकरांवर साकारतोय 'हा' आंतरराष्ट्रीय प्रकल्प

Published on

मुंबई (Mumbai) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबरच आता पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट अकॅडमी साकारतेय. सात एकरावर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी सुमारे ८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पनवेल महापालिकेने एम. ई. प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हे कंत्राट दिले आहे. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांची फाऊंडेशन ही अकॅडमी चालवणार आहे. (International Cricket Academy - Dilip Vengsarkar)

पनवेलमध्ये तब्बल 7 एकरांवर साकारतोय 'हा' आंतरराष्ट्रीय प्रकल्प
बीएमसीच्या 'त्या' 3500 कोटींच्या प्रकल्पात लोकायुक्तांची एन्ट्री

पनवेल परिसरात क्रिकेटची आवड असणारे खेळाडू मोठ्या प्रमाणात आहेत. अनेक पालक आपल्या पाल्यांना मुंबईतील खासगी क्रिकेट अकॅडमीमध्ये खेळण्यासाठी पाठवतात. पनवेलचे अनेक खेळाडू रणजीपर्यंत पोहोचले आहेत. पनवेल महानगरांमधून दर्जेदार क्रिकेट खेळाडू निर्माण व्हावेत, या शहराचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावे, यासाठी पनवेलमधील इंटरनॅशनल क्रिकेट अकॅडमी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांनी याकामी पुढाकार घेत या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली. एम. ई. प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. अकॅडमीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने विजयादशमीच्या मुहूर्तावर ती सुरू करण्याचा मानस महापालिकेने व्यक्त केला. दिलीप वेंगसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल महापालिका आणि वेंगसरकर फाऊंडेशन यांच्यात शुक्रवारी (ता. १) यासंदर्भातील करार करण्यात आला. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, महापालिका आयुक्त गणेश देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

पनवेलमध्ये तब्बल 7 एकरांवर साकारतोय 'हा' आंतरराष्ट्रीय प्रकल्प
पुण्यात जैववैद्यकीय कचरा विघटन प्रकल्प लवकरच कार्यान्वित

पनवेल सेक्टर ११ वरील भूखंड क्रमांक २५ वर क्रीडांगणासाठी जागा राखीव आहे. या ठिकाणी दर्जेदार स्टेडियम उभारण्याची मागणी संतोष शेट्टी यांनी सिडकोकडे लावून धरली होती. त्यानुसार येथे प्राधिकरणाने नियोजनसुद्धा केले होते; मात्र या जागेचा आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करण्याच्या उद्देशाने उपयोग व्हावा, अशा प्रकारचा विचारप्रवाह निर्माण झाला. त्यानुसार या जागेवर क्रिकेट प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या जागेला राजीव गांधी मैदान असे संबोधले जाते.

पनवेलमध्ये तब्बल 7 एकरांवर साकारतोय 'हा' आंतरराष्ट्रीय प्रकल्प
अकोला ते हिंगोली १२६ किलोमीटर रेल्वेचे अखंड विद्युतीकरण

आंतरराष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीमध्ये एकूण दोनशे खेळाडूंना एकाचवेळी प्रशिक्षण दिले जाणार आहे. या ठिकाणी प्रशिक्षण देत असताना पनवेलकरिता १०० जागा राखून ठेवण्यात येतील. पनवेल महापालिका क्षेत्राकरिता ५० आणि इतरांकरिता ५० जागा राहणार आहे. सात एकरावर उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी सात कोटी ९४ लाख २६ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

पनवेलमध्ये तब्बल 7 एकरांवर साकारतोय 'हा' आंतरराष्ट्रीय प्रकल्प
पुणे महापालिकेवर नामुष्की; शुद्ध पाण्यासाठी नदीखालून पाइपलाइन...

या आंतरराष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत वेगवेगळ्या वयोगटातील खेळाडूंचे अनेक सामने खेळवले जाणार आहेत. त्याचबरोबर मुंबई व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनबरोबर करार करून यांच्या माध्यमातून येथे क्रिकेट खेळवले जाण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू येथे स्थानिक खेळाडूंना मार्गदर्शन करतील.

पनवेलमध्ये तब्बल 7 एकरांवर साकारतोय 'हा' आंतरराष्ट्रीय प्रकल्प
अबब! गडकरींचा 'करिष्मा'; 30 कोटींचे कारंजे अन् तब्बल 12 मजली...

पनवेल परिसरात अनेक खेळाडू आहेत, की ज्यांना क्षेत्रामध्ये नैपुण्य संपादन करायचे आहे. येथे अनेक क्रिकेट सामने खेळवले जातील. त्यातून दर्जेदार आणि उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू घडवण्याचा आमचा उद्देश आहे.
- दिलीप वेंगसरकर, माजी कर्णधार, भारतीय क्रिकेट टीम

पनवेलमध्ये तब्बल 7 एकरांवर साकारतोय 'हा' आंतरराष्ट्रीय प्रकल्प
कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाबाबत पालिका मोठ्या निर्णयाच्या तयारीत

घराजवळ आणि गल्लीत क्रिकेट क्रिकेटपटू घडणार नाहीत. त्यासाठी चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण गरजेचे आहे. याच उद्देशाने पनवेल परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट अकॅडमी असावी, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना बोलून दाखवले होते. आमदार प्रशांत ठाकूर सिडकोचे अध्यक्ष असताना आम्हाला हा भूखंड मिळाला.
- डॉ. कविता चौतमोल, महापौर, पनवेल महापालिका

Tendernama
www.tendernama.com