आझादी का अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी 'या' महापालिकेने काढले टेंडर

Panvel Municipal Corporation
Panvel Municipal CorporationTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : भारतीय स्वातंत्र्याचे ७५वे वर्ष (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरे करण्यासाठी केंद्रापासून राज्य सरकारपर्यंत सर्वच पातळीवर मोठ्या प्रमाणात तयारी चालू असून, या निमित्ताने वर्षभर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसा आदेशच केंद्राने काढला आहे. वेगवेगळ्या सरकारी संस्था आणि केंद्र व राज्य सरकारच्या विभागांकडून त्या दृष्टीने नियोजनही केले जात आहे. मात्र, स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन करणे अडचणीचे असल्याचे सांगत यासाठी पनवेल महापालिकेने (Panvel Municipal Corporation) चक्क टेंडर काढले आहे. पालिका नवी असल्याने कर्मचाऱ्यांची संख्या कमी असून, अशा कार्यक्रमांच्या आयोजनाचा अनुभव नसल्याने टेंडर काढण्यात आल्याचे कारण पनवेल महापालिकेकडून देण्यात येत आहे.

Panvel Municipal Corporation
पुणे रेल्वे स्थानकाला मिळणार मोठा पर्याय; हे स्टेशन होणार टर्मिनल

केंद्र सरकारच्या आदेशानुसार बहुतांश स्थानिक स्वराज संस्था आणि विविध सरकारी विभागांनी भारतीय स्वातंत्र्याचे ७५वे वर्ष साजरे करण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून 'आझादी का अमृतमहोत्सव' साजरा करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने पुढील एक वर्ष चालणाऱ्या कार्यक्रमांसाठी इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सींकडून टेंडर मागवले आहेत. या संदर्भातील जाहिरात पनवेल शहरातील वर्तमानपत्रांमध्ये शुक्रवारी महापालिकेकडून प्रसिद्धीस देण्यात आली आहे. एका इंग्रजी दैनिकाने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

Panvel Municipal Corporation
स्पाॅट पंचनामा : अडीच कोटींच्या शिवसृष्टीत निकृष्ट साहित्याचा वापर

पनवेल महापालिके नव्याने तयार झालेली असल्याने अशा प्रकारच्या कार्यक्रमांचा पालिकेला अनुभव नाही, त्यामुळे आझादी का अमृतमहोत्वा निमित्त आयोजित कार्यक्रमांच्या नियोजनासाठी बाहेरील एजन्सीची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालिकेनेकडून स्पष्ट करण्यात आले. या संदर्भात बोलताना पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख म्हणाले, की आमच्या महापालिकेत जेमतेम 35 अधिकारी आहेत आणि आमचे बहुतांश कर्मचारी कंत्राटी आहेत. पनवेल महापालिका 2016 मध्ये स्थापन झाली आहे. आमची पालिका तुलनेने नवीन आहे आणि पालिकेला असे उत्सव आयोजित करण्याचा कोणताही अनुभव नाही.

Panvel Municipal Corporation
औरंगाबादच्या नव्या पाणी योजनेला सुनिल केंद्रेकर गती देणार का?

भारतीय स्वातंत्र्याचे ७५वे वर्ष साजरे करताना आयोजित कार्यक्रमांमध्ये इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तुलनेच पनवेल महापालिका मागे पडू नये म्हणून आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सींकडून टेंडर मागवण्याचा निर्णय घेतला आहे, असेही देशमुख यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की पनवेल महापालिकेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे उत्सवांच्या तयारीच्या कामात हे कर्मचारी अडकल्यास त्याचा परिणाम पालिकेच्या इतर कामांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टेंडर मागविण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com