CNG बाबत नवी मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर...

NMMC
NMMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : नवी मुंबई महापालिकेने (Navi Mumbai Municipal Corporation) दररोज जमा होणाऱ्या हरित कचऱ्यापासून (Green Wastage) सीएनजी गॅस (CNG Gas) आणि कोळसा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या वाशी आणि बेलापूर येथील मलनिस्सारण केंद्राच्या ठिकाणी हे दोन्ही प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यामुळे सध्या हरित कचऱ्यावर प्रक्रियेसाठी होणारा कोट्यवधींचा खर्च वाचणार असून, दोन्ही प्रकल्पांमधून महापालिकेला ५ ते ७ कोटींचे उत्पन्नही मिळणार आहे. महापालिकेने सध्या या दोन्ही प्रकल्पांसाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे.

NMMC
दावोसमध्ये सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचा डंका; जाणून घ्या कारण..

वाशी येथील प्रकल्पात हरित कचऱ्यापासून सीएनजी गॅस तयार करण्यात येणार आहे. हा सीएनजी गॅस महापालिकेला वाशी एनएमएमटी बससाठी वापरता येईल. शिवाय संबंधित ठेकेदाराकडून वर्षाला चार ते पाच कोटी रुपये उत्पन्न मिळेल, असा महापालिकेचा अंदाज आहे. तर बेलापूर येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या ठिकाणी बायोमिथेनेशन प्लॉट उभारण्यात येणार आहे. त्यातून बायोपचार व बिक्रेट्‌स अर्थात एक प्रकारचा कोळसा निर्माण होणार असून तो इंधन म्हणून वापरता येणार आहे. दिवसाला २० ते ३० टन कोळसा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. यातून महापालिकेला रॉयल्टीपोटी वर्षाला एक ते दीड कोटी रुपये उत्पन्न मिळू शकेल.

NMMC
Good News! पुणे महापालिकेत नोकरीची संधी; जाणून घ्या सविस्तर...

दोन्ही प्रकल्पांतील उत्पन्न हे अंदाजित असून ते कमी जास्त होण्याची शक्‍यता. यातून उत्पन्नापेक्षा हरित कचऱ्याची वाहतूक आणि प्रक्रियेवर सध्या होणारा खर्च वाचवून प्रदूषण थांबविणे हा महापालिकेचा मुख्य उद्देश असल्याचे शहर अभियंता संजय देसाई यांनी स्पष्ट केले.

NMMC
दावोस परिषद: महाराष्ट्रात 30000 कोटींच्या गुंतवणुकीने 66000 रोजगार

प्रदूषण कमी करणारे हे दोन्ही प्रकल्प आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात येणार आहेत. सध्या त्यांची टेंडर प्रक्रिया सुरू असून इच्छुक कंत्राटदराकडून प्रस्ताव मागविले आहेत. त्यासाठी ४५ दिवसांची मुदत असून त्यांनतर महापालिकेने घातलेल्या अटी व शर्थी पूर्ण करणाऱ्या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.

NMMC
20 टक्केही नालेसफाई नाही अन् प्रशासकांच्या नुसत्याच बाता

वाशी आणि बेलापूर येथे ग्रीन कचऱ्यावर प्रक्रिया करून सीएनजी आणि कोळसा निर्माण करणारे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यावर नवी मुंबई महापालिकेचा एक पैसाही खर्च होणार नाही. १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंत्राटदार दोन्ही प्रकल्प महापालिकेस कोणताही मोबदला न घेता आहे तसे सादर करतील, अशी प्रमुख अट आहे.
- संजय देसाई, शहर अभियंता, महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com