Nitin Gadkari : मुंबई ते नवी मुंबई विमानतळ 17 मिनिटांत सुसाट! काय आहे नितीन गडकरींचा प्लॅन?

Nitin Gadkari
Nitin GadkariTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई ते नवी मुंबई विमानतळ 17 मिनिटांत गाठता येणार आहे. त्यासाठी वॉटर टॅक्सी सेवा सुरू करणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले. (Navi Mumbai International Airport)

Nitin Gadkari
रखडलेल्या लातूर ते टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अनेक चुरसकथा समोर, ठेकेदाराने...

ठाणे येथे सोमवारी एका प्रचारसभेत ते बोलत होते. नवी मुंबई विमानतळ मार्च 2025 मध्ये सुरू होणार आहे. वॉटर टॅक्सी सेवा जगातील अनेक देशांमध्ये आहे. फ्रॉन्स, न्यूझीलंड, अमेरिकासह अनेक देशात वॉटर टॅक्सीद्वारे सार्वजनिक वाहतूक होते. भारतात प्रथम वॉटर टॅक्सी सेवा 2020 मध्ये केरळमध्ये सुरू झाली.

गडकरी म्हणाले, नवी मुंबई विमानतळाजवळ 'जेटी'ची निर्मिती यापूर्वीच झाली आहे. मुंबई आणि ठाणे परिसराला विशाल समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्राचा जल वाहतुकीसाठी वापर करून रस्त्यावरील गर्दी आणि प्रदूषण कमी करता येणार आहे. मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस-वे पूर्ण झाल्यावर मुंबई-पुणे महामार्गावरील गर्दी कमी होणार आहे.

Nitin Gadkari
Aditya Thackeray : मेट्रोचे काम पूर्ण होण्याआधीच 74 कोटींचा रंगरंगोटी घोटाळा; चढ्या दराचे टेंडर कुणासाठी?

ठाण्यात आता वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचा प्रश्न आहे. या ठिकाणी उड्डाण पूल बांधून देखील समस्या कायम आहे. ठाणे, मुंबई, दिल्ली या शहरांची सर्वात मोठी समस्या वायू प्रदूषण आणि जल प्रदूषण आहे.

मुंबई ठाणे शहराची प्रगती शैक्षणिक क्षेत्रामध्ये होत आहे. यामुळे शिक्षण आणि रोजगारासाठी येथे लोंढे वाढत आहेत. या भागातच नव्हे सर्वत्र विकास झाला पाहिजे. आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये पाहिजे तसा रोजगार उपलब्ध झाला नाही.

Nitin Gadkari
Pune : पुणे रिंग रोड प्रकल्प पुन्हा चर्चेत; काय आहे कारण?

महाराष्ट्रामध्ये सर्व मोठे उद्योग येत आहेत. 20 हजार कोटींची गुंतवणूक संभाजीनगरमध्ये होत आहे. राज्य आणि प्रशासन कसे असावे आणि ते कसे चालवावे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारखे आहे. परंतु गेल्या ६० वर्षांत काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाचा विकास झाला नाही, अशी टीका गडकरी यांनी केली. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com