नवी मुंबई मेट्रो टप्प्यात; 'या' बॅंकेमार्फत ५०० कोटींचा पतपुरवठा

Mumbai Metro
Mumbai MetroTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : नवी मुंबई मेट्रोकरिता सिडकोला आयसीआयसीआय (ICICI) बॅंकेमार्फत ५०० कोटींचा पतपुरवठा होणार आहे. यामुळे मेट्रोच्या कामांना गती येणार असून उर्वरित कामे नियोजित वेळेत पूर्ण होऊन लवकरच या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरु होणार आहे. यानिमित्ताने नवी मुंबई मेट्रो आणखी टप्प्यात आली आहे.

Mumbai Metro
कुलाबा, चर्चगेट,नरिमन पॉईंट भागातील कोंडी फुटणार;होणार उन्नत मार्ग

दरम्यान, आयसीआयसीआय बॅंकेकडून मंजूर करण्यात आलेल्या पतपुरवठ्यामुळे एकप्रकारे सिडकोच्या प्रकल्पांच्या विश्वासार्हतेवर मोहोर उमटविण्यात आली असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले आहे. सिडको उभारत असलेल्या मेट्रोचा बेलापूर ते पेंधर हा अकरा किमी लांबीचा आणि 11 स्थानके असणारा मार्ग आहे. या मार्गावरील व्हायडक्टचे काम पूर्ण झाले असून 11 पैकी 5 स्थानके प्रवासी वाहतुकीकरिता सुसज्ज झाली आहेत. या मार्गाकरिता सीएमआरएससह सर्व महत्त्वाच्या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. उर्वरित 6 स्थानकांचे काम वेगाने सुरू झाले असून संपूर्ण मार्गावर लवकरच प्रवासी वाहतूक सुरू होणे अपेक्षित आहे.

Mumbai Metro
मुंबई मेट्रो ३ मार्गावरील भुयारीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण

या मेट्रोसाठी ३ हजार ४०० कोटी इतका खर्च अंदाजित असून त्यापैकी २,६०० कोटींचा खर्च सिडकोकडून यापूर्वीच करण्यात आला आहे. उर्वरित खर्च आयसीआयसीआय बँकेच्या ५०० कोटींच्या पतपुरवठ्याद्वारे आणि सिडकोच्या अंतर्गत संचित निधीतून करण्यात येणार आहे. नवी मुंबई अंतर्गत कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या दृष्टीने मेट्रोचा प्रकल्प महत्त्वाचा असून येथील नागरिकांना प्रवासाचा उत्तम पर्याय देण्यासह बांधकाम क्षेत्राला चालना देण्याकरिता हा प्रकल्प मोलाची भूमिका बजावणार आहे. यासंदर्भात सिडको आणि आयसीआयसीआय बॅंकेत करार करण्यात आला. त्यानुसार आयसीआयसीआय बॅंकेकडून सिडको नवी मुंबई मेट्रो मार्गासाठी ५०० कोटींचा पतपुरवठा करण्यात येणार आहे. आयसीआयसीआय बॅंकेकडून मंजूर करण्यात आलेल्या पतपुरवठ्यामुळे मेट्रो प्रकल्पाकरिताची फायनान्शियल क्लोजर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आयसीआयसीआय बॅंकेकडून करण्यात येणाऱ्या या पतपुरवठ्यामुळे मेट्रोच्या कामांना गती मिळणार असून नियोजित वेळेत कामे पूर्ण होऊन लवकरात लवकर या मार्गावर प्रवासी वाहतूक करता येणे शक्य होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com