Mumbai : बीएमसी 100 वर्षे जुन्या 'त्या' चाळींचा 'बीडीडी'प्रमाणे पुनर्विकास करणार का?

BIT Chawl
BIT ChawlTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई सेंट्रल येथील बीआयटी चाळींचा (BIT Chawl) पुनर्विकास बीडीडी चाळींच्या (BDD Chawl) धर्तीवर करावा व त्याकरीता मुंबई महानगरपालिकेने (BMC) धोरण निश्चित करून टेंडर (Tender) काढावे या मागणीसाठी चाळीतील रहिवासी एकवटले असून त्यांनी विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे.

BIT Chawl
Pune : रिंगरोडच्या दोन्ही बाजूच्या एक किमी अंतरातील गावांच्या विकासाचे अधिकार सरकारने दिले 'यांना'

मुंबई सेंट्रल येथील बीआयटीच्या १९ इमारतींचा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न २००६ सालापासून सुरू आहे. मात्र त्यात आतापर्यंत अनेक वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे गेली कित्येक वर्षे या चाळींचा पुनर्विकास रखडला आहे.

या चाळ समूहात रहिवाशांच्या दोन संघटना असून त्यापैकी बीआयटी चाळ सेवा संघा या रहिवासी संघटनेने नुकतेच आंदोलन केले व निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला.

BIT Chawl
नगरला जोडणाऱ्या 'त्या' रेल्वे उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणासाठी 320 कोटींचे टेंडर

मुंबईतील सर्वच बीआयटी चाळींना १०० वर्षे पूर्ण झालेली असल्याने बीडीडी चाळींच्या पुनर्विकास धोरणानुसारच बीआयटी चाळींचा पुनर्विकास करावा, अशी मागणी चाळवासियांची आहे. जुने संमतीपत्र दाखवून रेटण्यात येत असलेल्या प्रस्तावाला या संघटनेने विरोध केला आहे.

मुंबई महापालिका प्रशासनाने स्वतः टेंडर मागवून विकासकाची निवड करावी, अशी मागणी चाळीतील रहिवासी गेल्या अनेक महिन्यांपासून करत आहेत. मात्र महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे चाळकऱ्यांनी हा पवित्रा घेतला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com