मुंबई ते नागपूर व्हाया नाशिक बुलेट ट्रेन; अहवाल अंतिम टप्प्यात

Bullet Train

Bullet Train

Tendernama

Published on

मुंबई (Mumbai) : अहमदाबाद (Ahmedabad) ते मुंबई बुलेट ट्रेन (Bullet Train) प्रकल्पाचे काम सुरु झाले असतानाच राज्यातील दोन शहरांना जोडणाऱ्या मुंबई ते नागपूर व्हाया नाशिक बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामालाही गती देण्यात येत आहे. या मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात असून तो पुढील महिन्यात पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.

Bullet Train

टेंडरनामा इम्पॅक्ट: बेस्टचा 'तो' वादग्रस्त निर्णय अखेर रद्द

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबरोबरच येत्या महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्यातील महत्त्वाच्या शहरांना जोडणारा मुंबई ते नागपूर व्हाया नाशिक बुलेट ट्रेन प्रकल्पावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात असून तो पुढील महिन्यात पूर्ण होईल. मुंबई ते नाशिक, नागपूर या ७३६ किलोमीटर मार्गाचेही एरियल लिडार सर्वेक्षण, शिवाय प्रकल्पाचे रेखाचित्र, पर्यावरणावरील आणि सामाजिक परिणाम यासह अन्य सर्वेक्षण व कामेही केली जात असून ही कामे अंतिम टप्प्यात आहेत.

Bullet Train

मुंबई-पुणे आणखी सुपरफास्ट; चिरले ते खालापूर रस्त्यासाठी सल्लागार

यासंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना विचारले असता, या प्रकल्पाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनचा सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले.

Bullet Train

मुंबई पालिकेचा अजब कारभार; ठेकेदार नियुक्तीनंतर नेमला सल्लागार

वैशिष्ट्ये...
ठाणे, नाशिक, नगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, अमरावती, वर्धा या जिल्ह्यातून धावणार. सध्या मुंबई ते नागपूर रस्ते मार्गे किमान १२ तास लागतात. बुलेट ट्रेन झाल्यास हाच प्रवास चार तासांत. बुलेट ट्रेनचा मार्ग समृद्धी महामार्गाला समांतर असेल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com