माथेरानच्या डोंगर रांगांखालील 'त्या' दुहेरी बोगद्याचे मिशन सक्सेस; जुलै 2025 पर्यंत बडोदा ते मुंबई सुसाट

Mumbai-Vadodara Highway
Mumbai-Vadodara HighwayTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : बडोदा ते मुंबई महामार्गाच्या शेवटच्या पॅकेजमधील माथेरान डोंगर रांगांखालील शिरवली गावाजवळील दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. पहिल्या बोगद्याचे खोदकाम ऑगस्ट महिन्यात पूर्ण झाले आहे. १३ मीटर उंच आणि २३ मीटर रुंदीच्या या दुहेरी बोगद्यात ८ वेगवेगळ्या मार्गिका आहेत. सध्या मिशन मोडवर या रस्त्याचे बांधकाम सूरु आहे, जुलै २०२५ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्धिष्ट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निश्चित केले आहे. या कामावर १४०० कोटी रुपये खर्च केला जात आहे.

Mumbai-Vadodara Highway
'धारावी पुनर्विकास'; 7500 एकर जमिनीवरील आरक्षण उठवले; जनता दलाचा गंभीर आरोप

या दुहेरी बोगद्यामुळे आणि प्रशस्त महामार्गामुळे काही मिनिटांत बदलापूर ते पनवेल, उरण जेएनपीटी बंदर आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठता येणार आहे. सिडकोची दक्षिण नवी मुंबई म्हणजेच नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्राला (नैना) थेट दिल्लीशी जोडणाऱ्या मुंबई बडोदा या महामार्गामुळे पनवेलचे महत्त्व वाढणार आहे. पुढील ९ महिन्यात या रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कंबर कसली आहे. ४.३९ किलोमीटर अंतर असलेल्या दुहेरी बोगद्याचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच या महामार्गाच्या शेवटचे पॅकेजचे क्रमांक १७ चे ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

Mumbai-Vadodara Highway
Mumbai : गोरेगाव-मुलुंड लिंक रोडबाबत बीएमसीचा मोठा निर्णय; 12 कोटी खर्चून...

पावसाळा संपल्यावर पुन्हा एकदा कामाने गती घेतली आहे. दुहेरी बोगद्याचे काम वेळेआधी पूर्ण झाले आहे. पॅकेज १७ हा ९.६ किलोमीटर अंतराचा असून बदलापूरच्या भोज गावापासून ते पनवेलमधील मोरबे गावापर्यंत हा रस्ता बांधला जाणार आहे. बडोदा मुंबई महामार्गाचे पॅकेज क्रमांक १७ चे बांधकाम पुढील ९ महिन्यात पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सूरु आहेत. या पॅकेजनंतर हा महामार्ग विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेला पनवेलच्या मोरबे गावाजवळ जोडला जाणार आहे. विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेसाठी निधीची अडचण निर्माण झाल्याने या महामार्गासाठी भूसंपादनाचा मोबदला 'एमएसआरडीसी' पनवेलच्या शेतकऱ्यांना देऊ शकलेली नाही. त्यामुळे भूसंपादनच रखडल्याने विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या बांधकामाविषयी साशंकता निर्माण झाली आहे. मोरबे ते कोन गावापर्यंत हे काम 'एमएसआरडीसी'मार्फत करण्याचे नियोजित आहे. त्यासाठी टेंडर प्रक्रिया पार पडली. 'एमएसआरडीसी'ने मोरबे गावातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम दिली. मात्र मोरबे गावानंतर इतर गावांचे भूसंपादन रखडल्याने या बहुउद्देशीय मार्गिकेच्या कामाचा श्रीगणेशा होऊ शकलेला नाही. कर्जाचा निधी उपलब्ध झाल्यानंतरच 'एमएसआरडीसी' या मार्गाचे काम हाती घेऊ शकेल, असा अंदाज आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com