Mumbai : बीएमसीच्या 'त्या' टेंडरमध्ये मर्जीतील कंत्राटदारासाठी रेड कार्पेट; पुन्हा Tender Scam ?

Ambadas Danve
Ambadas DanveTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबईतील उपनगरीय रुग्णालयात बहुद्देशीय कामगार उपलब्ध करण्यासंदर्भात काढलेल्या ई-टेंडरमध्ये (E - Tender) चुकीच्या पद्धतीने कंत्राटदार (Contractor) नियुक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात अनियमितता होऊन घोटाळा (Scam) झाला असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. कंत्राटदाराची चुकीच्या पद्धतीने नियुक्ती करण्यात आल्यामुळे कार्यारंभ आदेश तात्काळ रद्द करण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

Ambadas Danve
Nashik : सिटीलिंक बसेसेवेची संपातून सुटका होणार; दुसरा पुरवठादार पुरविणार वाहक

टेंडरमध्ये ५ टेंडर सादर करणाऱ्या कंत्राटदारांपैकी ४ कंत्राटदारांनी दर विश्लेषण हे परिशिष्ट ब प्रमाणे सादर केलेली आहेत. तर एकाच कंत्राटदाराने दर विश्लेषण हे टेंडर जाहीर करणाऱ्या विभागाला अपेक्षित असलेल्या परिशिष्टाप्रमाणे सादर केलेले आहे. याबाबत फक्त एकाच कंत्राटदाराला हेतूपुरस्सर कळविण्यात आले असल्याची शंका दानवे यांनी व्यक्त केली.

Ambadas Danve
Nashik : 'मेडा'चा प्रताप! 20 कोटींचे सौरऊर्जा प्रकल्प रखडले; जबाबदार कोण?

१० कोटी रक्कमेच्या टेंडर प्रक्रियेत फक्त एकमेव प्रतिसादात्मक टेंडर असताना संपूर्ण प्रक्रिया पार पडल्याचे दिसून आले. एका विशिष्ट कंत्राटदाराच्या फायद्यासाठी या सर्व बाबी केल्याचे दिसून येते. त्यामुळे महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची शंका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.
  
यात मर्जीतल्या कंत्राटदाराला हेतूपुरस्पर हे कंत्राट देण्यासाठी टेंडर प्रक्रियेत अनियमितता करून या कंपनीची निवड करण्यात आली असल्याने ही ई-टेंडर प्रक्रिया तातडीने रद्द करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com