Mumbai Pune : मुंबई-पुणे 20 मिनिटांत! Altra Fast Hyperloop प्रोजेक्टबाबत मोठी बातमी...

Hyperloop
HyperloopTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : नव्या युगाचा वाहतूकीचा एक पर्याय म्हणून राज्य सरकारने मुंबई ते पुणे अल्ट्रा फास्ट हायपरलूप प्रोजेक्टची (Mumbai Pune Ultrafast Hyperloop Project) घोषणा केली होती. या हायपर लूप तंत्रज्ञानाने मुंबई ते पुणे हे अंतर दर ताशी 496 या प्रचंड वेगाने अवघ्या 20 मिनिटांत संपेल असे म्हटले जात होते. परंतू सध्या देशात हायस्पीड हायपरलूप सुरु होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी रविवारी स्पष्ट केले आहे.

Hyperloop
CAG : हाफकीनचा अंदाधुंद कारभार; 50 कोटींच्या नुकसानीला जबाबदार GM सुभाष शंकरवारना पुन्हा मुदतवाढ कशी?

मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018 या गुंतवणुकदारांच्या परिषदेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध 43 सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. या करारामुळे महाराष्ट्रात 12 लाख कोटींची गुंतवणूक होणार असल्याचे सांगण्यात आले होते. या सामंजस्य करारात देश विदेशातील नामांकित उद्योग समूहांचा समावेश आहे. यात व्हर्जीन हायपरलूप 40 हजार कोटींच्या सामंजस्य कराराचाही समावेश होता. आता हे तंत्रज्ञान परिपक्वतेच्या सर्वात खालच्या पातळीवर असून, सध्या ते आर्थिक रुपाने व्यवहार्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Hyperloop
राज्याच्या वित्त विभागाचा अजब न्याय; आदेश झुगारणाऱ्यांना बक्षिसी अन् नियम पाळणाऱ्यांना शिक्षा

व्हर्जिन हायपर लूप तंत्रज्ञान आणि त्याची व्यावसायिक व्यवहार्यता तपासण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीचे सारस्वत अध्यक्ष आहेत. त्यांनी म्हटले की काही विदेशी कंपन्यांनी भारतात हायपरलूपचे तंत्रज्ञान आणण्यात रस दाखविला आहे. एका मुलाखतीत सारस्वत म्हणाले की आपल्या देशात हायपर लूपसाठी परदेशातून जे प्रस्ताव आले, ते जास्त व्यवहार्य पर्याय नाहीत. हे तंत्रज्ञान अजूनही खूपच प्राथमिक अवस्थेत आहे.

व्ही. के.सारस्वत यांनी म्हटले की, आम्ही आजच्या स्थितीत याला जास्त महत्व देत नाही. या तंत्रज्ञानाला केवळ अभ्यासाच्या पातळीवर पाहिले जात आहे. मला वाटत नाही की निकटच्या भविष्यात हायपर लूप तंत्रज्ञान आपल्या परिवहन व्यवस्थेचा भाग होईल. 

Hyperloop
Nashik : केंद्राच्या 100 ई-बसचा डेपो होणार आडगावला

हायपरलूप एक हायस्पीड ट्रेन असून जी ट्यूबच्या निर्वांत पोकळीत धावते. इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला आणि अंतराळ प्रवास कंपनी स्पेसएक्सची मालकी असलेल्या अब्जाधीश इलॉन मस्क यांचे हे प्रस्तावित तंत्रज्ञान आहे. व्हर्जिन हायपरलूपची पहिली चाचणी 9 नोव्हेंबर 2020 रोजी अमेरिकेतील लास वेगास येथे 500 मीटरच्या ट्रॅकवर एका पॉडआधारे केली होती. यात एक भारतीय आणि अन्य प्रवासी होते. याचा वेग 161 किलोमीटर प्रति तास इतका होता.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com