Mumbai: नवीन 8 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना प्रत्येकी 400 कोटी मंजूर; बांधकामांची टेंडर प्रक्रिया गतीने सुरू

MBBS Collage
MBBS CollageTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : राज्य शासनाच्या पाठपुराव्यामुळे राज्यात नवीन ८ वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे. या आठ महाविद्यालयात एकूण ८०० विद्यार्थ्यांना एमबीबीएसकरीता (MBBS) प्रवेश मिळणार आहे. गेल्या काही महिन्यात मुंबई (Mumbai), नाशिक (Nashik), गडचिरोली, अमरावती, वाशिम, जालना, बुलडाणा, अंबरनाथ, भंडारा आणि हिंगोली अशा एकूण १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना (Medical Collages) परवानगी मिळाली आहे.

MBBS Collage
Tender Scam: एकाही रुग्णवाहिकेचा पुरवठा न करता ठेकेदारांवर महिना 33 कोटींची दौलतजादा

या १० महाविद्यालयांच्या बांधकामाकरिता व इतर आवश्यक साधनसामुग्रीसाठी प्रत्येक महाविद्यालयास ४०३ कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे बांधकाम दर्जेदार, गुणवत्तापूर्वक होण्यासाठी केंद्र शासनाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामार्फत कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामार्फत १० महाविद्यालयाची बांधकाम टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच बांधकामे सुरू करण्यात येणार आहेत.

MBBS Collage
Nagar: बांधकाम कामगार मंडळाच्या 'त्या' धोरणांना का होतोय विरोध?

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचे शासनाचे धोरण आहे. आता राज्यात एकूण ३५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. आता वर्षाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४८५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. राज्यातील अनेक विद्यार्थी विविध देशांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जात होते. विद्यार्थी संख्या वाढल्याने आता विद्यार्थी राज्यातच शिक्षण घेऊ शकतात.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री, राज्यमंत्री यांच्या सहकार्यामुळे राज्यात कमी कालावधीत इतक्या मोठ्या प्रमाणात वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com