गिरणी कामगारांच्या घरांसाठी 'हा' महत्वाचा निर्णय

Mill Worker

Mill Worker

Tendernama

Published on

मुंबई (Mumbai) : गिरणी कामगारांच्या घरासाठी मुंबई महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या वाट्याला आलेल्या विखुरलेल्या लहान भूखंडांच्या बदल्यात महापालिकेने स्वत:कडील मोठा भूखंड देऊन अदलाबदली केली आहे. त्याच बरोबर या भूखंडाचे आरक्षण बदलून त्यावर गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्याचा मार्ग मोकळा केला जाणार आहे.

Mill Worker

खुद्द छत्रपतींशी बेईमानी करणारा गद्दार कोण?

गिरण्याची जमीन विकल्यावर त्याची वाटणी केली जाते. त्यात, म्हाडाच्या वाट्याला 27 ते 33 टक्के भूखंड महापालिकेच्या वाट्याला 33 टक्के भूखंड आणि उर्वरीत भूखंड हा खरेदीदाराला मिळतो. दक्षिण मध्य मुंबईतील सहा गिरण्यांच्या जमिनीतील प्रत्येकी 27 टक्के वाटा म्हाडाला गिरणी कामगारांची घरे बांधण्यासाठी मिळाला होता. या सहा भूखंडाचे एकत्रित क्षेत्रफळ 3 हजार 873.83 चौरस मीटर आहे. तर, महानगर पालिकेला मिळालेला शिवडी येथील एम.एस.टी.सी मिलचा परेल शिवडी डिव्हीजन येथील 3 हजार 607.83 चौरस मीटरचा भूखंड महापालिकेने म्हाडाला दिला आहे. त्या बदल्यात विखुरलेले लहान भूखंड म्हाडाने महापालिकेला दिले आहेत.

Mill Worker

मुंबई : चारकोप, गोराईतील सोसायट्यांचा होणार समूह पुनर्विकास

महापालिकेच्या ताब्यात असलेला शिवडी येथील हा भूखंड मनोरंजन मैदानासाठी राखीव आहे. त्या भूखंडाचे आरक्षण बदलून तो भूखंड निवासी पट्ट्यात समाविष्ठ करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव प्रशासनाकडून महासभेत मांडण्यात आला आहे. जेणेकरुन या भूखंडावर गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

Mill Worker

कोविडचा फटका; 'बीएमसी'चे जाहिरात उत्पन्न निम्म्यावर

महापालिकेला या भूखंडाच्या अदला बदलीत 4 कोटी 33 लाख रुपयांचे शुल्क मिळणार आहे. या भूखंडावर महानगर पालिकेने मनोरंजन मैदानही तयार केले आहे. मात्र, हा भूखंड गिरणी कामगारांच्या घरांसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे या मैदानावर झालेला खर्च न घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला आहे. या हस्तांतरणाच्या प्रक्रियेचा सर्व खर्च म्हाडाला करायचा आहे.

Mill Worker

बीएमसी निवडणूक एक्सप्रेस; रस्ते दुरुस्ती सुसाट, कॉंक्रिटीकरणावर भर

या मोठ्या भूखंडाच्या बदल्यात महापालिकेला काळाचौकी येथील एमएसटीसी मिलचा 1 हजार 9.83 चौरस मीटर, काळाचौकी येथील मफतलाल मिलचा 481.43 चौरस मीटरचा भूखंड, लोअर परळ येथील मातुल्य मिलचा 388.30 चौरस मीटरचा भूखंड, सात रस्ता येथील हिंदुस्थान मिलचा 542.10 चौरस मीटरचा भूखंड, परळ येथील व्हिक्‍टोरीया मिलचा 850 चौरस मीटर आणि माहिम येथील 602.17 चौरस मीटरचा भूखंड असे 3 हजार 833.83 चौरस मीटरचे भूखंड पालिकेला हस्तांतरीत होणार आहेत. पालिका म्हाडाला देत असलेला भूखंड या भूखंडाचे क्षेत्रफळ या सहा भूखंडाच्या एकत्रित क्षेत्रफळापेक्षा लहान आहे. मात्र, हे भूखंड विखुरलेले लहान असल्याने त्यावर घरांची बांधणी नियम आणि तांत्रिक दृष्ट्या अडचणीचे आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या सहा भूखंडाचे आरक्षण निवासी पट्ट्यातून काढून ते मनोरंजन उद्यान, उद्यानासाठी आरक्षित करण्यात येणार आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com