Mumbai : महापालिकेचा 'तो' महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुसाट; सर्व अडथळे दूर

Mumbai
BMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाआड येणारी मालाडमधील ५१ बांधकामे मुंबई महानगरपालिकेच्या पी उत्तर विभागाने कारवाई करून हटवली. त्यामुळे या प्रकल्पाला वेग येणार आहे. तसेच मालाडमधील वाहतूक समस्या सोडवण्यासही मदत होणार आहे.

Mumbai
BMC Tender News : मुंबई महापालिका 700 कोटींचे 'ते' टेंडर का करणार रद्द?

पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा गोरेगाव मुलुंड जोडरस्ता मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. सुमारे १२.२ किमी लांबीचा हा मार्ग चार ते पाच विभागातून जातो. या मार्गावर अनेक ठिकाणी बांधकामे, अनधिकृत बांधकामे असल्यामुळे ती टप्प्याटप्प्याने हटविण्यात येत आहेत. याच कारवाईचा भाग म्हणून शुक्रवारी गोरेगांव – मुलुंड जोडरस्ता रुंदीकरणात बाधित होत असलेली एकूण ५१ बांधकामे पी उत्तर विभागाने हटवली. या ५१ बांधकामांमध्ये सात निवासी व ४४ अनिवासी बांधकामांचा समावेश होता.

Mumbai
Mumbai News : मुंबईकरांसाठी आली चांगली बातमी; 'ते' पूल जोडणीचे काम अंतिम टप्प्यात

परिमंडळ ४चे उपायुक्त विश्वास शंकरवार, पी/ उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी ही कारवाई पार पाडली. दोन जेसीबी यंत्र , ३० कामगार आणि सात अभियंते यांच्या मदतीने ही बांधकामे निष्कासित करण्यात आली. दरम्यान, मालाडमधील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या पी / उत्तर विभाग कार्यालयाच्या वतीने एका पाठोपाठ एक रस्ता रुंदीकरणाची कामे हाती घेतली आहेत. याचाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारे सांताक्रूझ-चेंबूर, अंधेरी-घाटकोपर, जोगेश्वरी-विक्रोळी हे तीन जोडरस्ते आहेत. मात्र दोन्ही उपनगरांमधील वाढती लोकसंख्या, वाहनांची वर्दळ लक्षात घेता गोरेगाव-मुलुंड हा चौथा जोडरस्ता बांधण्याचा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला आहे. सुमारे १२.२० किलोमीटरच्या या रस्त्यामुळे गोरेगाव ते मुलुंड हे अंतर अत्यंत कमी वेळात गाठणे शक्य तर होईलच, सोबत मोठ्या प्रमाणात इंधन बचत होईल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com