Mumbai : बहुचर्चित गोखले पुलाची एक लेन आजपासून खुली

Gokhale Bridge
Gokhale BridgeTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाची एक लेन आज सोमवार संध्याकाळपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी दिली. दरम्यान, मुंबई शहरचे पालक मंत्री दीपक केसरकर व उपनगरचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी ६.३० वाजता एक लेनचे उद्घाटन होणार असल्याचे समजते.

Gokhale Bridge
Mumbai : बायोगॅसपासून उजळणार ग्रँट रोड येथील एलटी मार्केट परिसर

अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल धोकादायक झाल्याने नोव्हेंबर २०२२ पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. गोखले पूल वाहतुकीसाठी बंद झाल्याने अंधेरी पूर्व व पश्चिमेसह वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण झाली. गोखले पुलाचे काम जलदगतीने करावे, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी लावून धरली. परंतु रेल्वे हद्दीतील पुलाचे काम कोण करणार, यावर वाद निर्माण झाला आणि मुंबई उपनगरचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लक्ष घालत, पश्चिम रेल्वे व मुंबई महापालिकेच्या पूल विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर पुलाचे काम महापालिका करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Gokhale Bridge
Mumbai : बेस्टच्या 2400 ई-बसचे टेंडर 'ऑलेक्ट्रा'च्या खिशात; 4 हजार कोटी...

त्यानंतर महापालिकेने २ डिसेंबर २०२३ रोजी पहिला गर्डर लाँच केला. तसेच पुलाजवळील पोच रस्त्याचे काम पूर्ण केले. त्यामुळे एप्रिल २०२३ मध्ये पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र पुलासाठी लागणारे गर्डर पंजाब येथील अंबालामधील कंपनीत तयार करण्यास उशीर झाल्याने पुढील कामे रखडली. हा पूल चार लेनचा असून पश्चिम द्रुतगती महामार्ग अंधेरी पूर्व ते एसव्ही रोड अंधेरी पश्चिम असा जोडतो. तसेच तेली गल्लीला कनेक्टर आहे. पुलाचा दुसरा भाग डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणार असल्याने संपूर्ण पूल डिसेंबरनंतर वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com