'बीएमसी'च्या जकात नाक्यावर बस टर्मिनस, बिझनेस हब

mumbai

mumbai

Tendernama

Published on

मुंबई (Mumbai) : वस्तू व सेवा कर लागू झाल्यापासून वापरा विना असलेल्या मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) जकात नाक्यांच्या भूखंडावर बस टर्मिनस, बिझनेस हब बरोबरच मनोरंजन सुविधा पुरविण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी लवकरच सल्लागार नियुक्ती करण्यात येणार आहे. ही घोषणा महापालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यातून उत्पन्न मिळवण्याचाही महापालिकेचे ध्येय आहे.

mumbai

पुण्यातील नदी पात्रातील रस्ता बंद झाल्यानंतर 'हा' उभारणार पर्याय

लांबपल्याच्या खासगी बसेस मुंबईत उभ्या राहाण्यासाठी जागा नाही. जकात नाक्यांचा वापर यासाठी करण्यात येणार आहे. मुंबईत पूर्व उपनगरात चार आणि पश्‍चिम उपनगरात दोन असे सहा जकात नाके आहेत. त्यापैकी मानखुर्द आणि दहिसर येथील जकात नाक्यांवर प्रयोगिक तत्वावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. बाहेरुन आलेल्या बसेस या ठिकाणी थांबल्यावर शहरी बसने प्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत जाता येणार आहे. या वाहतुकीसाठी विशेष आरखडा तयार करण्यात येणार आहे.

mumbai

उत्पन्न वाढीसाठी 'बीएमसी'ची भन्नाट आयडियाची कल्पना

जकात नाके उपनगराच्या हद्दीवर असल्याने तेथे बिझनेस हब उभारण्याचाही विचार पुढे आहे. यासाठी महानगर पालिकेने विकास आराखड्यातही तरतूद केली आहे. शहराच्या हद्दीवर बिझनेस हब उभे राहिल्याने शहाराच्या अंतर्गत वाहतुकीवरील ताण कमी होईलच त्याच बरोबर त्यातून पालिकेला बक्कळ उत्पन्नही मिळेल, असा अंदाज आहे. तसेच, मनोरंजनाच्या दृष्टीने जकात नाक्याच्या काही भागाचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी सल्लागार नियुक्तीचे काम लवकरच पूर्ण होईल, असे आयुक्त डाॅ.आय एस चहल यांनी नमूद केले.

mumbai

मुंबई उपनगरात चार थीम पार्क साकारणार; २५ कोटींचे टेंडर

मुंबईत हंगामात लांब पल्ल्याच्या पाच हजारपर्यंत बसेस येतात.
सर्वसाधारण वेळी ही संख्या दोन ते तीन हजार असते.
अवजड वाहानांची रोजची संख्या चार ते पाच हजार आहे.

- मानखुर्द जकात नका क्षेत्रफळ - 29 हजार 774 चौरस मिटर
- दहिसर जकात नाका क्षेत्रफळ - 24 हजार 682 चौरस मिटर

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com