Mumbai : पावसाळी खड्ड्यांसाठी बीएमसीचे 250 कोटींचे बजेट; खड्डे शोधण्यासाठी अभियंत्यांचा दुचाकीवरून फेरफटका

Mumbai
BMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबईत पावसाळ्यात खड्ड्यांचा त्रास होऊ नये, यासाठी सुमारे २४० कोटी खर्चाची टेंडर काढण्यात आली आहेत. या टेंडरअंतर्गत ९ मीटरपेक्षा कमी आणि जास्त रूंदी असलेल्या शहर आणि उपनगरातील रस्त्यांवरील खड्डे पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतरही बुजवण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर सोपवण्यात आली आहे. तसेच पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे पडतात. यासाठी प्रत्येक रस्त्यावरचा अपडेट घेणे आणि खड्डा पडल्यास कंत्राटदार, महापालिकेची सेंट्रल एजन्सी व वॉर्ड स्तरावर बुजवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी विशेष करून पावसाळ्यात ज्या ठिकाणी खड्डे पडण्याची तक्रार आणि निदर्शनास येत असल्यास, अशा ठिकाणी बारीक लक्ष ठेवा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Mumbai
Mumbai Ahmedabad Bullet Train News : समुद्राखाली तयार होतोय बोगदा; काम युद्धपातळीवर सुरू

मुंबईत मान्सून पूर्व आणि पावसाळ्यात पडणारे खड्डे बुजवण्यावर महापालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी कुठल्या रस्त्यावर खड्डे, याचा शोध घेण्यासाठी रस्ते विभागातील अभियंत्यांनी टू व्हीलरवर फिरा, असे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. चारचाकी वाहनातून फिरल्यास कुठल्या रस्त्यावर खड्डे हे लक्षात येत नसल्याने टू व्हीलरवर फिरून ज्या रस्त्यांवर खड्डे दिसतील, ते वेळीच बुजवा, असे आदेश दिल्याचे बांगर यांनी सांगितले. पावसाचे आगमन पुढील काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी नालेसफाईसह खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांनीही सूचना केल्या आहेत की, सेंट्रल एजन्सी आणि वॉर्ड स्तरावर खड्डे बुजवण्याची होणारी कामे यात वाद न घालता खड्डे बुजवण्यास प्राधान्य द्यावे. एखाद्या ठिकाणी खड्डे बुजवण्याकडे कंत्राटदार दुर्लक्ष करत असल्यास, तत्काळ याची माहिती उपलब्ध करावी, जेणेकरून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करणे शक्य होईल. यासाठी महापालिकेच्या सातही परिमंडळातील उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांनी दररोज व्हिजिट करत आढावा घ्यावा, असे निर्देश दिल्याचे ते म्हणाले.

Mumbai
Mumbai News : कशी असेल मुंबईची नवी ओळख?

मान्सूनपूर्व कामे सध्या जोरात सुरू असून पाऊस जोपर्यंत पडत नाही, तोपर्यंत कामे सुरू ठेवण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. तसेच रस्ते विभागातील अभियंत्यांनी स्वत: दुचाकी किंवा मोटारसायकलवर फिरून खड्डा पडल्याचे निदर्शनास येताच, ते तत्काळ बुजवण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश दिल्याचे अभिजित बांगर यांनी सांगितले. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून पावसाळापूर्व व पावसाळ्यात खड्डे बुजवण्याचे काम सुरू असते. महापालिकेची यंत्रणा वॉर्डस्तरावर खड्ड्यांची माहिती घेत ते बुजवत असते. परंतु आपल्या प्रभागातील रस्त्यावर खड्डा पडल्यास त्याची तक्रार करण्यासाठी तयार करण्यात आलेला पॉट होल ट्रॅकिंग सिस्टिमचे सॉफ्टवेअर अपडेट करण्यात येत आहे. याआधी तक्रारकर्त्याला १० ते १२ ठिकाणी नोंद करावी लागत होती. मात्र आता ॲपवर चार-पाच ठिकाणी नोंदणी करता येणार आहे. कुठल्या रस्त्यावर खड्डा पडला, त्या रस्त्याचे लोकेशन, खड्ड्यांचा फोटो, वॉर्ड अशी चार ते पाच वेळा नोंदणी करता येणार आहे, असेही ते म्हणाले.

मुंबईतील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी सहा हजार कोटींचे काम देण्यात आले आहे. मात्र यातील शेकडो कामे अद्याप सुरूच झालेली नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात खड्ड्यांचा त्रास होऊ नये, यासाठी मार्चमध्ये १८० कोटी तर एप्रिलमध्ये सुमारे ६० कोटींहून अधिक खर्चाच्या निविदा मागवल्या आहेत. या कंत्राटाच्या अंतर्गत ९ मीटरपेक्षा कमी आणि जास्त रूंदी असलेल्या शहर आणि उपनगरातील रस्त्यांवरील खड्डे पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतरही बुजवण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर सोपवण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com