Mumbai Municipal Corporation : जलबोगद्यांसाठी 433 कोटी खर्च करणार

प्रकल्पाचा सर्वाधिक लाभ पूर्व उपनगरांना
BMC
BMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई शहरातील डोंगराळ आणि उंचवट्यावरील भागात पाणी पुरवठ्याची समस्या लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने जलबोगद्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात 433 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा सर्वाधिक लाभ पूर्व उपनगरांना होणार आहे. घाटकोपर, चेंबूर, वडाळा, कुर्ला आणि परळ-भायखळ्यापर्यंतच्या भागात सुरळीत पाणीपुरवठा होईल. यासोबतच मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि वडाळा ट्रक टर्मिनल संकुलातील पाणीपुरवठ्यातही सुधारणा होणार आहे.

BMC
Hindenburg Effect: 'अदानी'च्या धारावी पुनर्विकास टेंडरवर प्रश्न!

चेंबूरमधील अमर महलपासून वडाळा ते परळ दरम्यान एकूण 9.70 किलोमीटर लांबीचा पाण्याचा बोगदा बांधला जात आहे. अमर महल-चेंबूर ते प्रतीक्षा नगर (सायन) पर्यंत 2 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे. याशिवाय वडाळा ते परळ दरम्यान बोगदा खोदाईचे कामही अंतिम टप्प्यात आहे. हा प्रकल्प एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

BMC
Mumbai : वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोड; 2 महिन्यात 9000 कोटीचे टेंडर

अमर महल ते ट्रॉम्बे जलाशय दरम्यान 5.50 किलोमीटर लांबीचा पाण्याचा बोगदा बांधला जात आहे. त्याचे साडेतीन किलोमीटरचे खोदकाम पूर्ण झाले आहे. ट्रॉम्बेतील सखल भागांपासून ते उंच भागापर्यंत सुमारे 2 किमीपर्यंत उत्खनन करण्यात आले आहे. त्याचे काम ऑक्टोबर 2024 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या बोगद्यातून गोवंडी आणि चेंबूर भागाला पाणीपुरवठा होणार आहे. पवई ते घाटकोपर जलबोगदा प्रकल्प नोव्हेंबर 2022 मध्ये पूर्ण करण्यासाठी कार्यादेश जारी करण्यात आला आहे. सुमारे 4 किलोमीटर लांबीचा हा बोगदा तयार झाल्याने या भागाचा पाणीप्रश्न सुटण्याची अपेक्षा आहे.

BMC
Mumbai : वरळीतील '360 वेस्ट'मध्ये आलिशान घरांसाठी 1200 कोटींची डील

बाळकुम (ठाणे) ते मुलुंड दरम्यान प्रस्तावित जलबोगद्याच्या पूर्वअभ्यासाचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी सल्लागाराची मदत घेतली जाणार आहे. सल्लागार प्रकल्पाची आवश्यकता, तपशीलवार तांत्रिक माहिती आणि नियोजन यावर देखरेख करेल, लवकरच टेंडर प्रक्रिया सुरू होणार आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com