Mumbai : बीएमसीच्या 'त्या' महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अखेर 3520 कोटींचे टेंडर; इस्रायली तंत्रज्ञान वापरणार

BMC
BMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने अखेर टेंडर प्रक्रिया सुरु केली आहे. मनोरी येथे प्रस्तावित असणाऱ्या या प्रकल्पासाठी सुमारे ३५२० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पात दैनंदिन ४०० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी इस्रायली तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.

BMC
Devendra Fadnavis : धारावी पुनर्विकास टेंडरमधील अटी-शर्ती ठाकरे सरकारच्या काळातील

मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा प्रकल्पातून दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र आडव्या उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने होत असून मुंबईच्या लोकसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत मुंबईला दररोज ४५०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. मात्र पाणीनिर्मितीचे नवीन स्त्रोत निर्माण करणे शक्य नसल्याने समुद्राचे पाणी गोडे करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन वर्षांपासून या प्रकल्पाला गती मिळत नव्हती. मात्र आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी टेंडर मागवल्याने लवकरच हा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाल्यानंतर ही टेंडर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. कंत्राटदाराला २० वर्षे या प्रकल्पाच्या देखभालीचे काम करावे लागणार आहे.

BMC
Mumbai : 'त्या' कंत्राटदाराला निष्काळजीपणा भोवला; बीएमसीने ठोठावला तब्बल 1 कोटी 33 लाखांचा दंड

हा प्रकल्प सौरऊर्जेवर चालणार आहे. 'एमटीडीसी'कडून मिळणाऱ्या १२ हेक्टर जागेवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी इस्रायली तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. मनोरीत प्रकल्प उभारला जाणारा भाग खडकाळ आहे. या ठिकाणी कांदळवन नाही. त्यामुळे या प्रकल्पामुळे पर्यावणाला कोणतीही हानी पोहोचणार नाही. त्यामुळे हा प्रकल्प पर्यावरणपूरक ठरणार आहे. मनोरी येथे प्रस्तावित असणाऱ्या या प्रकल्पासाठी एकूण ३५२० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पात एकूण ४०० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करून पाणी पिण्यायोग्य बनवण्यात येईल. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २०० दशलक्ष लिटर खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्यात येईल. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य वापरता यावे, यासाठी कुलाबा येथे १२ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेचा हा पहिलाच प्रयोग असून यासाठी २५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्पही लवकरच कार्यान्वित केला जाणार असून हे पाणीदेखील पिण्यायोग्य बनवण्याचे प्रस्तावित आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com