BMC : सायन ते लालबागदरम्यान भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांची सफाई; 31 कोटी खर्च

Nala safai
Nala safaiTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबईतील भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये दोन मॅनहोलमधील अंतर ३० मीटर असल्याने अंतर्गत गाळ काढण्यात अडचणी येतात. तसेच पावसाळ्यात मनुष्यबळाचा वापर करणे शक्य होत नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेने सायन ते लालबागदरम्यान मशीनद्वारे साफसफाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी महापालिका सुमारे ३१ कोटी रुपये खर्च करणार आहे. मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेडला हे टेंडर मिळाले आहे.

Nala safai
EXCLUSIVE : आमदार अण्णा बनसोडे यांनी आरोप केलेले चंद्रकांत गायकवाड आहेत तरी कोण?

मुंबई महापालिकेच्या शीव ते लालबागपर्यंतच्या ब्रिटिशकालीन जुन्या भूमिगत पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांमध्ये गाळ जमा झाल्याने अनेकदा पावसाचे पाणी वाहून नेण्यात अडचणी येतात. भूमिगत पावसाळी वाहिन्यांची साफसफाई मनुष्य प्रवेश असणाऱ्या मॅनहोल्सपुरतीच केली जात असल्याने दोन मॅनहोल्समधील अंतरामधील सफाई होत नाही. परिणामी पावसाचे पाणी वाहून नेण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आता या भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांची साफसफाई करून दोन मॅनहोलमध्ये साचलेला गाळ मशिन्सद्वारे साफ करण्यात येणार आहे.

Nala safai
Thane : कंत्राटी बस वाहकांचा अर्धा पगार खाणारे बोके कोण?

"मुंबई शहर व उपनगरात पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे तयार करण्यात आले आहे. मुंबई शहरात भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांची मोठ्या प्रमाणात जाळे पसरलेले असून, या पर्जन्य जलवाहिन्यांचे बॉक्स व आर्च वाहिन्यांची योग्य प्रकारे देखभाल मनुष्यबळ व मशिनरीच्या सहाय्याने केली जाते. परंतु दोन मनुष्य प्रवेशिकामध्ये अर्थात मॅनहोलमधील सर्वसाधारणपणे अंतर हे ३० मीटर एवढे असल्याने ते साफ करण्यासाठी सुयोग्य अशी मशिनरी तसेच कुशल मनुष्यबळ या महापालिकेकडे उपलब्ध नाही.

Nala safai
Mumbai : तब्बल 90 कोटींचे वादग्रस्त टेंडर भोवले; 'या' अधिकाऱ्याची तडकाफडकी...

भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांत असलेला अंधार, विषारी वायू आणि हवा खेळती नसल्यामुळे हे काम खात्यांतर्गत मनुष्यबळाने करून घेणे शक्य नसल्याने या कामांसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यासाठी मागवलेल्या टेंडर प्रक्रियेत मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली असून, पुढील ३१ महिने पावसाळा वगळून हे टेंडर देण्यात आले. या कामामुळे सायन ते लालबागदरम्यान पावसाचे पाणी तुंबण्याचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास महापालिकेला वाटतो. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com