सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी २५० कोटींचे टेंडर; बीएमसी येथे...

Sewage Project
Sewage ProjectTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पिण्यायोग्य करण्यासाठी मुंबई महानगरपालिका कुलाबा येथे प्रायोगिक तत्वावर 12 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करणार आहे. महापालिकेने 250 कोटींचा खर्च अपेक्षित असलेल्या याकामाचे टेंडर प्रसिद्ध केले आहे.

Sewage Project
शिंदे सरकारची १ लाख कोटींच्या 'या' महत्त्वाकांक्षी योजनेची तयारी

मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी सात धरणांतून दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो. मुंबईची लोकसंख्या दीड कोटींच्या घरात पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पिण्याव्यतिरिक्त कामासाठी उपलब्ध करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या जल विभागाकडून नवनवीन प्रयोग राबवण्यात येतात. वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईला दररोज 4 हजार दशलक्ष लिटर पिण्याच्या पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या नवीन स्त्रोतांचा शोध घेतला जात असून कुलाबा येथील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. प्रायोगिक तत्वावर 12 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे. महापालिकेने येत्या दोन वर्षांत हा प्रयोग यशस्वी करण्याचे उद्धिष्ट ठेवले आहे.

Sewage Project
नाशिक-मुंबई प्रवासाला का लागताहेत 5 तास? NHAIकडून तारीख पे तारीख..

मुंबई महापालिकेचा हा पहिलाच प्रयोग आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर कुलाबा, नेव्ही नगर या परिसरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येईल असे महापालिकेच्या जल विभागाचे प्रमुख अभियंता पुरुषोत्तम मालावडे यांनी सांगितले. टेंडरमध्ये पात्र ठेकेदारावर १५ वर्षे प्लांटची देखभाल, दुरुस्ती करण्याची जबाबदारी राहणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com