Mumbai : महापालिकेच्या शाळाही CCTVच्या निगराणीखाली; पहिल्या टप्प्यात 18 कोटींचे बजेट

Schools
SchoolsTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेच्या १२३ शाळांमध्ये पहिल्या टप्प्यात सीसीटीव्ही बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यावर १८ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. या शाळांमध्ये २८०० कॅमेरे लावले जाणार आहेत. हे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. तसेच महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च येऊ शकतो आणि हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी सहा महिने लागू शकतात, असा अंदाज आहे.

Schools
Mumbai Goa Highway : मुख्यमंत्री शिंदे थेट उतरले रस्त्यावर; गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग...

मुंबई महापालिकेच्या एकूण १,१२९ प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. त्यापैकी ९४३ प्राथमिक शाळा आहेत. त्याशिवाय महापालिकेकडून पूर्व प्राथमिक वर्गही चालविले जातात. याठिकाणी एकूण ३ लाख ६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिकेच्या या शाळांमध्ये ९ हजार शिक्षक कार्यरत आहेत. मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दीड वर्षापूर्वी महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही प्रशासनाला बजावले होते. पण अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नव्हती. त्यामुळे गेल्या आठवड्यात महापालिका मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत केसरकर संतप्त झाले. त्यांनी महापालिकेचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार कंकाळ यांचे निलंबन झाले.

Schools
Mumbai : अटल सेतूवरुन 7 महिन्यांत विक्रमी 50 लाख वाहने सुसाट!

सोमवारपासून महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू झाले आहे. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी १०० कोटी रुपये खर्च येऊ शकतो आणि हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी सहा महिने लागू शकतात, अशी माहिती महापालिकेतील उच्चपदस्थांनी दिली. बदलापूरच्या घटनेनंतर राज्यातील शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकाही खडबडून जागी झाली असून शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे रेकॉर्डिंग आणि बॅकअप सुरक्षित ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे अत्याचाराच्या घटनांना आळा बसणार असून अशा घटना घडल्यास गुन्हेगारांना तत्काळ शिक्षा देणे शक्य होणार आहे. महापालिका शाळांमधील सर्व स्वच्छतागृहांची सफाई करण्याचे काम महिला सफाई कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com